महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज हवे असल्यास आपण बँकेत जात असतो तसे सेवा संस्थेमध्ये पण सध्या कोरोनाचा पदूर्भाव असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातून ऑनलाईन प्रक्रियांद्वारे पीक कर्ज मागणी अर्ज स्वीकारत आहेत.
आपल्याला खालील प्रमाणे ज्या जिल्यात पीक कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन स्वीकारत आहेत. त्या जिल्याची ऑनलाईन लिंक खाली त्या जिल्याच्या समोर देत आहे . त्यावर आपण ज्या जिल्याचे शेतकरी आहे. त्याच्यासमोर क्लीक करून फॉर्म भरू शकता.
त्या त्या जिल्याच्या gov.in वर हि संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तेथून आपण हि माहिती उपलब्ध केलेली आहे.
याचा फॉर्म कसा भरावा याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास खाली त्याचा वीडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे तो पहा.
खाली जिल्हा प्रमाणे पिक कर्ज मागणी अर्ज लिंक देण्यात आलेली आहे पहा.
- सोलापूर :- सोलापूर पिक कर्ज मागणी अर्ज २०२१-२२
- परभणी :- येथे क्लिक करा.
- जालना :- जालना पिक कर्ज प्रक्रिया
- औरंगाबाद:- येथे क्लिक करा.
- बीड :- येथे क्लिक करा
आपल्याला बाकीच्या जिल्ह्याच्या पीक कर्ज यादी लिंक उपडेट करण्यात येतील त्यामुळे या वेबसाईट ला पुन्हा पुन्हा भेट द्या
सूचना :- शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी. अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल. महत्वाची सूचना – सर्व आकडे इंग्रजी मध्ये भरावे.
सूचना :
अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल. त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल. फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.