September 7, 2024

लेक लाडकी योजना असा करा अर्ज Lek ladki yojana online apply

lek ladki yojana महाराष्ट्र सरकारने दि. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या मुलींसाठी खास योजना आणली असून यामध्ये १ लाखापर्यंत अनुदान मिळणारी योजना आहे. “लेक लाडकी योजना” या योजनेला महाराष्टात सर्वत्र सुरवात करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज कुठे करावा, कागदपत्रे कोणती, अनुदान किती मिळणार सर्व माहिती आजच्या लेखात मिळणार आहे. (lek ladki yojana)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक १ एप्रिल, २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यात आली आहे.

लेक लाडकी योजना उद्दिष्टे

  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे,
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
  • मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे,
  • कुपोषण कमी करणे,
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण ० (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.

लेक लाडकी योजना अनुदान किती ?

सदर योजनेसाठी खालील प्रमाणे अटी व शर्ती तसेच कागदपत्रें देण्यात आलेली आहेत. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुदान किती मिळणार याची माहिती देण्यात आलेली आहेत.

१) मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये,

२) मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये,

३) मुलगी इयत्ता सहावीत गेल्यानंतर ७ हजार रुपये,

४) अकरावीत मुलगी गेल्यावर ८ हजार रुपये,

५) लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

लेक लाडकी योजनेच्या अटी शर्थी

१) ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

२) पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

३) तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील, मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

४) दिनांक १ एप्रिल, २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

५) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.

६) लाभार्थी बैंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.

७) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

१) लाभार्थीचा जन्माचा दाखला

२) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम

अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.

३) लामार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)

४) पालकाचे आधार कार्ड

५) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

६) रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)

७) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

८) संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)

९) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार)

१०) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).

अर्ज कोठे जमा करावा

खालील विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून तो पूर्ण भरावा , त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडावी त्यानंतर आपण तो अर्ज आपल्या गावच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावा. तसेच आपण अर्जाची पोहोच पावती सुद्धा घ्यावी. लेक लाडकी योजना या योजनेचा ऑनलाईन फॉर्म हा अंगणवाडी सेविका तथा मुख्यसेवीका यांनी करावी तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व कागदपत्रे अपलोड करावी

अर्ज डाउनलोड

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

फॉर्म कसा भरावा यासाठी व्हिडिओ बनवला आहे खालीलप्रमाणे व्हिडिओ पहा आणि अर्ज भरा.

lek ladki yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *