July 12, 2025
gharkul rojgar hami

PMAY-G : घरकुलसाठी मनरेगा योजनेतून पैसे कसे मिळवायचे?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ही ग्रामीण भागातील गरिब लोकांना रोजगार देणारी महत्त्वाची योजना आहे. पण बऱ्याच लोकांना हे माहित नसते की घरकुल (PMAY-G) योजनेतून घर बांधताना सुद्धा मनरेगाच्या मजुरीचा लाभ मिळू शकतो. हा लाभ कसा मिळवायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनरेगातून घरकुलासाठी पैसे कसे मिळतात?

  1. प्रधानमंत्री घरकुल आवास अंतर्गत घरकुल मंजूर झाल्यावर तुम्ही तुमच्या कुटुंबासह स्वतः बांधकामात श्रमदान करू शकता.
  2. हे श्रम मनरेगा योजनेअंतर्गत नोंदवले जातात, आणि त्याचे पैसे सरकारी मजुरीच्या दरानुसार तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
  3. यासाठी आपल्या कुटुंबाकडे जॉब कार्ड असणे अनिवार्य आहे.

जॉब कार्ड कसे काढावे यासाठी येथे क्लिक करा

लागणारी पात्रता आणि प्रक्रिया:

  1. जॉब कार्ड असणे आवश्यक.
  2. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत (PMAY-G) यादीत नाव असणे.
  3. काम सुरू करण्यापूर्वी ग्रामसेवक/रोजगार सेवक यांना माहिती द्या.
  4. आपल्या कडे कमीत कमी ८ लोक मजूर म्हणून आवश्यक.
  5. कामाच्या दरम्यान तुमची व त्यांची हजेरी दररोज नोंदवा.
  6. काम केलेल्या दिवसांचे पैसे बँकेत जमा होतात.

किती मजुरी मिळू शकते?

  1. 90 दिवसांची मजुरी मिळू शकते.
  2. एका दिवसाला मजुरी ₹297 ते ₹312 दर आहे. (दर बदलत असतो ).
  3. एकूण आपल्याला ₹26730 – ₹28,080 पर्यंतचा लाभ योजनेतून मिळू शकतो.
  4. यामध्ये मजुरांच्या खात्यावर त्याच्या हजेरीनुसार पैसे येतात.
कोणते काम मनरेगात येते?
  1. पाया खोदकाम व भूमिपूजन
  2. वाळू, माती, विटा वाहतूक
  3. बांधकामाचे सहाय्यक काम
  4. गवंड्याना लागणारी मदत
  5. घराभोवतालच्या परिसराची सफाई

रोजगार हमी रोजगार मागणीचा अर्ज – नमुना ४ खालीलप्रमाणे download करा

ग्रामरोजगार सेवक महत्वाचा दुवा

आपल्याला घरकुल मजूर झाल्यानतर रोजगार सेवककडे आपली जॉब कार्ड प्रत व मजुरांची नवे द्यावी लागतील. आपल्या घराच्या प्रगतीनुसार वेळेवर मस्टर काढून घ्यावे लागेल.तसेच घराच्या प्रगतीनुसार घराचे फोटो त्यांना द्यावे लागतील . यानंतर रोजगार सेवक मस्टर काढून तुमची हजेरीनुसार त्यांची नोंद घेतील. यानंतर आपल्याला मजुरांच्या खात्यावर पैसे येतील. यासाठी आपल्या गावच्या रोजगार सेवककडे सपर्क करा.

घरकुल लाभार्थीचा अश्या प्रकारे फोटो घ्यावे लागतात.

PMAY-G
📌 महत्वाचे टीप:
  • हा लाभ पूर्णतः मोफत आहे. कोणतीही फी नाही.
  • कोणी पैसे मागितल्यास ग्रामसेवक किंवा BDO कार्यालयात तक्रार करा.
  • बँक खाते व आधार लिंक असणे आवश्यक आहे.

📞 अधिक माहिती साठी संपर्क करा:

  • ग्रामपंचायत कार्यालय
  • रोजगार सेवक / ग्रामसेवक
  • PMAY-G व MGNREGA अधिकृत वेबसाईट: https://nrega.nic.in

📝 निष्कर्ष:

मनरेगा योजना ही तुमच्या घरकुल बांधणीसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तुमच्याकडे जॉब कार्ड असल्यास आणि PMAY-G यादीत नाव असेल, तर स्वतः काम करून सरकारकडून मजुरीचे २८०००रु पर्यत अनुदान मिळवू शकता आणि तुमचे घर साकार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *