April 19, 2024

रोजगार हमी योजना लाभार्थी यादी कशी पहावी

रोजगार हमी योजना लाभार्थी यादी कशी पहावी | How to view Employment Guarantee Scheme Beneficiary List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्याला माहित आहे का आपल्या गावामध्ये कोणकोणत्या सरकारी योजनेमध्ये कोणी कोणी लाभ घेतलेला आहे. आपल्या ग्रामपंचायत मध्ये शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर योजना राबीवल्या जातात. या सर्व योजना रोजगार हमी योजनेशी संबंधित असतात त्यामध्ये आपल्याला लाभ मिळत असतो. तर आपल्या गावच्या कोणत्या लाभार्थीने कोणते काम घेतले आहे, तसेच पूर्वी कोणी कोणते अनुदान घेतले आहे . आणि काम पूर्ण झाली आहेत का अपूर्ण आहेत हे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

आपल्याला आपल्या गावची विविध योजनांची लाभार्थी यादी कशी पहावी हे माहित आहे का ? आपल्या गावच्या कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ घेताना आपल्याला जॉब कार्ड असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे कोणतेही योजना घेणेसाठी रोजगार हमी योजनेतून आपल्याला मजुरी अनुदान तसेच विविध योजनेचा लाभ मिळत असतो.

उदा. घरकुल योजना, फळबाग लागवड, शोषखड्डा , विहीर योजना, शेततळे, गोठा अनुदान, कुक्कुटपालन शेड , शेळीपालन शेड अश्या विविध योजनेचा लाभ घेता येतो.


आपल्याला गावातील अश्या विविध योजनेचा लाभ कोणी कोणी घेतला आहे हे पहा.

१) ग्रामपंचायत योजना लाभार्थी येथे क्लिक करा

  • सर्वात प्रथम आपल्याला वरील वेबसाईट वर जावे लागेल.
  • त्यानंतर आपले राज्य निवडावे.
  • त्यानंतर कोणत्या वर्षाची माहिती पाहणार ते वर्ष select करा.
  • त्यानंतर आपल्या समोर आपले जिल्हा,तालुका,गाव निवडा
  • ग्रामपंचायत सीलेक्ट करावे लागेल.
  • शेवटी सबमिट (PROCED) करावे.

२)त्यानंतर आपल्याला आपल्या गावचा सर्व डेटा ओपन होईल यामधील आपल्याला R5 IPPE शोधून आपल्याला LIST OF WORK यावर क्लिक करावे लागेल .

३) त्यानंतर पहा आपल्याला सर्वात प्रथम कामाचा वर्ग दिसेल त्यावर क्लिक करून कामाचा वर्ग निवडा

त्यानंतर work status आणि Financial Year select करावे लागेल त्यानंतर आपल्या गावची लाभार्थी यादी दिसेल.

आपल्याला या गावच्या यादीमध्ये पूर्वीपासून कोणत्या लाभार्थीने कोणते काम केले आहे. त्याचबरोबर कोणत्या वर्षी काम घेतलेले आहे, हे काम पूर्ण झाले आहे का, काम नवीन आहे का हि सर्व माहिती आपल्याला या रोजगार हमी योजनेमध्ये दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *