September 7, 2024

असे मिळवा ऊसतोड कामगार ओळखपत्र

ऊसतोड कामगार ओळखपत्र | Sugarcane Workers Identity Card | Sugarcane Workers Identity Card Maharashtra | ऊसतोड कामगार नोंदणी | ऊसतोड कामगार प्रमाणपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील प्रत्येक गांवामध्ये ऊसशेती हि केली जाते. ऊस तोडणीसाठी प्रत्येक गावामध्ये ऊसतोड कामगार हे काम करत असता. तर त्यांना शासनाच्या योजना मिळण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे एक ओळखपत्र असावे यासाठी आपल्याला आपल्या ग्रामपंचायत मध्ये ऊसतोड कामगार ओळखपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्याचबरोबर अर्ज कसा भरावा त्याच्या मागर्दर्शक सूचना खालीलप्रमाणे मिळून जाईल.

राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांचे जीवन अस्थिर व अत्यत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी उद्योग , उर्जा व कामगार विभाग , शासन निर्णय क्र . असंका १११ ९ / प्र.क्र .११० / काम .७ अ , दिनांक १३ सप्टेंबर , २०१ ९ अन्वये गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आले आहे .

शासन निर्णय :

राज्यातील ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांची ग्रामसेवकाने ( संबंधित गावातील , वस्त्यांमधील , तांड्यामधील व पाड्यांमधील व इतर ) नोंदणी करावी . ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यासाठीचा सर्व्हेक्षण / आवेदन पत्राचा व ओळखपत्राचा विहीत नमुना सोबत जोडल्याप्रमाणे राहिल . ग्रामसेवकाने ऊसतोड कामगारांची नोंदणी विहित नमुन्यात करून ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

फॉर्म भरण्याकरीता मार्गदर्शक सूचना

१) एक अर्ज हा एका कुटुंबासाठी असेल .

२) कुटुंब व्याख्या : – पती , पत्नी व त्यांची अविवाहीत मुले .

३) विवाहीत मुलांचे स्वतंत्र कुटुंब समजावे .

४) वृध्द आहे – वडिल ऊसतोडणीला जात असल्यास त्यांचेही स्वतंत्र कुटुंब ग्राह्य धरावे . मात्र वृध्द आई – वडिल ऊसतोडणीला जात नसल्यास त्यांची माहिती ऊसतोडणीला जाणाऱ्या मुलाच्या कुटुंबात घ्यावी .

५) विधवा , परितक्त्या महिला ऊसतोडणीला जात असल्यास त्यांचे स्वतंत्र कुटूंब ग्राह्य धरावे व त्यामध्ये त्यांची अविवाहीत मुले यांचा समावेश करता येईल .

६. मागील २-३ वर्षात ऊसतोडणीला न गेलेले मात्र त्यापुर्वी किमान ५ वर्ष ऊसतोड करणाऱ्या मजुरांचाही ऊसतोड कामगार यामध्ये समावेश करण्यात यावा .

७. विवाहीत मुले यांचे स्वतंत्र कुटूंब ग्राह्य असल्याने त्यांच्या मागील ३ वर्षाचा तपशील हा अविवाहीत असतानाचा ग्राह्य धरावा .

अर्ज डाउनलोड करा 👇

ऊसतोड कामगार प्रमाणपत्र डाउनलोड करा 👇

वरील अर्ज डाउनलोड करून आपण भरावा त्यानंतर आपल्या ग्रामपंचायत मध्ये जमा करावा.त्यानंतर आपल्याला योग्य पडताळणी करून ऊसतोड कामगार ओळखपत्र दिले जाईल.

अधिक माहिती साठी टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *