July 27, 2024

PM Matru Vandana Yojana 2024 pdf download marathi

भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत शारीरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे देशातील गभर्वती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दि.१ जानेवारी २०१७ पासून Matru Vandana Yojana ( प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ) कार्यान्वित करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Matru Vandana Yojana योजनेतंर्गत पात्र लाभार्थी महिलेने अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तिला पहिल्या अपत्यासाठी रु. ५०००/- ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्यात रु. ६०००/- चा लाभ आधारशी लिंक बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT) व्दारे जमा केला जाईल.

योजनेची उद्दिष्टे

  • माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
  • जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा.
  • सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूणहत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल.
  • लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सूविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृध्दिंगत करणे.
  • नवजात अर्भकाच्या जन्माबरोबरच जन्मनोंदणीचे प्रमाणात वाढ व्हावी

कागदपत्रे

( किमान १ कागदपत्रे दयावे)

१) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु.८ लाख पेक्षा कमी आहे.

२) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला.

    ३) ४०% व अधिक अपंगत्व असणा-या (दिव्यांग जन) महिला.

    ४) ई-श्रम कार्ड धारक महिला.

    ५) आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.

    ६) बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला.

    ७) किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.

    ८) मनरेगा जॉब कार्ड धारक महिला.

    ९) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,आशा कार्यकर्ती.

    खालील कागदपत्रे व तपशील देणे आवश्यक आहे.

    १) लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र त्यासोबत विहित केलेले कागदपत्र.

    २) परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.

    ३) लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत

    ४) बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्राची प्रत

    ५) माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.

    ६) गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.

    ७) लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक.

    ८) वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र.

    फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे

    नवीन पोर्टल वर ऑनलाईन पध्दतीने आशा तथा फिल्ड फंक्शनरी (ज्या कार्यक्षेत्रात आशा स्वयंसेविका नाही तेथे आंगणवाडी सेविका), आरोग्य सेविका तथा सुपरवायजर आणि स्वतः लाभार्थी यांना फॉर्म भरता येईल.

    फॉर्म A डाउनलोड करा

    फॉर्म B डाउनलोड करा

    ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

    Matru Vandana Yojana

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *