July 27, 2024

baby care kit yojana maharashtra 2024

महाराष्ट्र राज्यात baby care kit yojana ( बेबी केअर कीट योजना ) २०१९ पासून सुरु करण्यात आली. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेसाठी कोणत्या वस्तू मिळतात, याचा अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेबी केअर कीट योजना हि महाराष्ट्र शासनाद्वारे २६ जानेवारी २०१९ पासून सुरु करण्यात आली. या योजनेत आपल्याला लाभ मिळवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किवा जवळच्या शासकीय रुग्णालयात पहिल्या प्रसुतीच्या वेळी जन्माला येणाऱ्या बालकाला बलाच्या उपयोगातील “baby care kit yojana” चा लाभ दिला जातो.

शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नोंद झाल्यानतर व प्रसूती झाल्यानंतर २ महिन्याच्या आतमध्ये अर्ज सादर केल्यानात गरोदर महिलेच्या पहिल्या प्रसुतीच्या वेळी लहान बाळाला बेबी केअर कीटचा लाभ मिळणार आहे. या baby care kit मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार ते पहा.

बेबी केअर कीट योजना लिस्ट

बेबी केअर कीट योजनेमध्ये लहान बाळासाठी खालील साहित्य मिळणार आहे.

  • खेळणी
  • हातमोजे
  • पायमोजे
  • नीलकटर
  • मुलासाठी कपडे

  • गादी (छोटी)
  • टॉवेल
  • तेल शरीर मालिश
  • मच्छरदाणी

  • शॅम्पू
  • आईसाठी गरम कपडे
  • बॉडी वॉश लिक्विड
  • सॅनिटायझर
  • कांबळ ( थंडीपासून बचाव )
  • थर्मामीटर

अश्या वस्तू या बेबी केअर किट बॉक्स मध्ये मिळणार आहेत.

बेबी केअर किट योजनेची उद्दिष्ठे

रुग्णालयामध्ये मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहन देणे.

बाल मूत्यु दर कमी आणणे

नवजात बालक व बाळंतीण महिलेला सुरक्षेतीता पुरविणे

दोन हजार रूपये किमतीचे बेबी केअर किट पुरविणे

बेबी केअर किट कसे मिळवाल

बेबी केअर किट योजेनचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपण पहिल्या प्रसूतीच्या वेळी आपण आपली नाव नोंदणी शासकीय रुग्णालयात करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रस्तुतीनंतर दोन महिन्याच्या आत आपल्याला बेबी केअर किट योजनेसाठी अर्ज करावा लागेल. तो कसा करावा पहा.

सर्वात प्रथम आपण बेबी केअर किट योजेनसाठी एक अर्ज भरावा लागेल. अर्ज खालील प्रमाणे मिळेल.

अर्ज भरून आपण आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे फॉर्म जमा करावा.

हा अर्ज अंगणवाडी सेविका स्वीकारतील आणि योग्य कागदपत्रे घेऊन पुढील कार्यालयाकडे पाठवतील

यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात जन्म होणाऱ्या सर्व मुलांना हे बेबी केअर किट संबंधित रुग्णालयात किंवा आरोग्य विभागात दिले जाते.यासाठी आपण आपल्या अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकता.

baby care kit yojana

अर्ज Download येथे करा

अर्ज download 👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *