December 13, 2024

उपसरपंच निवडणुकीसाठी थेट निवडून आलेल्या सरपंचाला मतदानाचा अधिकार

आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक संपलेली असते. त्यानंतर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेला असतो. जनतेतून सरपंच निवडून आल्यानंतर सर्व तयारीला लागतात ते म्हणजे ग्रामपंचायतीची दुसरी महत्वाची खुर्ची ‘उपसरपंच‘ यांची. उपसरपंच यांची जनतेतून निवड नसते, तर ती आपल्या प्रभागातून निवडणून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच यांची निवड होते. आता उपसरपंच होण्यासाठी आपल्याला निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाला उपसरपंच म्हणून निवडून आणता येते . पण उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज केल्यानंतर त्यापैकी जास्त मते ज्या सदस्याला पडतात तो उपसरपंच होतो. आता यामध्ये उपसरपंच पदासाठी कोणाला मतदान करता येते त्याचबरोबर थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना किती मतांचा अधिकार असतो ते आपण पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येक पंचायत आपल्या निवडून आलेल्या सदस्यांमधून एका सदस्याला उप सरपंच म्हणून निवडून देईल. यामध्ये निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला एक मतदान करण्याचा अधिकार असतो. तर थेट जनतेतून आलेल्या सरपंचांना मतदानाचा कोणता अधिकार असतो ते पहा.

१. उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंच यांना मतदानाचा अधिकार असेल व सदर निवडणूकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

२. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायदयाने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणूकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे.

३. उपसरपंच पदाची निवडणूकीची सभा तहकुब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सदरची सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तात्काळ घेण्यात यावी.

४. उपसरपंचाच्या निवडणूकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३३ मधील पोट कलम ६(४) मधील तरतुदीस अनुसरुन तात्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करुन विहित कालावधीमध्ये पंचायतीचे गठन होणे शक्य होईल.

आपल्याला वरील प्रमाणे उपसरपंच निवडणुकीसाठी थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे अधिकार सांगण्यात आलेले आहेत.

आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा बद्दल माहिती हवी असल्यालास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व संपूर्ण माहिती

ग्रामपंचायत मासिक सभा नियम व संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *