October 31, 2024

Food Licence Apply 2024 in Maharashtra

आपल्याला आपल्या किराणा दुकानाचे किंवा हॉटेल कोणत्याही शॉपचे Food Licence असणे गरजेचे असते. हे लायसन्स कसे असते,कोठे मिळते आणि आपण कसे मिळवायचे याबद्दल या लेखात माहिती देण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Food licence म्हणजे काय ?

आपल्याला कोणताही अनपदार्थाशी निगडित व्यवसाय सुरु करायचा असेल तर तो सुरु करण्यासाठी आपल्याला भारत सरकारचे food licence घेणे गरजेचे असते. चौदा अंकी नोंदणी परवाना असलेले हे fssai चे प्रमाणपत्र असते. हे आपल्याला fssai या संस्थेकडून मिळते. कोणाकोणाला हे लायसन्स गरजेचे आहे आहे.

फूड लायसन्स कोणासाठी गरजेचे आहे?

फूड लायसन्स परवाना हा हॉटेल व्यवसाय, तेल प्रोसेसिंग युनिट,चहा टपरी,किरणा दुकान, डेअरी युनिट, कत्तलखाना मांस प्रक्रिया, री-पॅकर्स, रेस्टारंट,अन्न प्रक्रिया युनिट, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, कँटीन, कॅटरिंग, उपहारगृह, खाद्यपदार्थ दूध वाहतूक, फेरीवाला, इ-कॉमर्स ऑनलाईन फूड डिलिव्हरी, फास्ट फूड, चायनीज सेंटर अशा सर्व व्यवसायिंकांसाठी food licence (FSSAI) परवाना हा गरजेचा आहे.

FSSAI लायसन्स चे फायदे काय ?

  1. आपल्याला अन्न व्यवसायासाठी महत्वाचे दस्तऐवज आहे.
  2. अनेक कायदेशीर लाभ मिळवण्यासाठी.
  3. शुद्ध खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवले जातात.
  4. ग्राहक जागरुकता निर्माण होण्यासाठी.
  5. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याद्वारे विषारी पदार्थांपासून लोकांचे संरक्षण केले जाऊ शकते.
  6. अन्न सुरक्षा सुविधेचा लाभ मिळतो.
  7. FSSAI विविध खाद्यपदार्थांसाठी फक्त एकच परवाना प्रदान करते.
  8. संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी FSSAI परवाना आवश्यक आहे.
  9. FSSAI परवाना असल्यास व्यवसायात विस्तार करु शकतो आणि मोठ्या संधीचा लाभ आपण घेऊ शकतो.

कोणती कागदपत्रे लागतात

FSSAI परवाना मिळविण्यासाठी, तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतरच तुम्हाला हा परवाना मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती महत्त्वाची कागदपत्रे?

  • पॅन कार्ड
  • चालक परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • पत्त्याचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराचे नाव आणि योग्य पत्ता असलेले अधिकृतता पत्र
  • लाईट बिल
  • ग्रामपंचायत ना हरकत दाखला
Food Licence

ऑनलाईन अर्ज कसा करावा

सर्वात प्रथम आपल्याला फूड लायसन्स काढण्यासाठी fssai च्या वेबसाईट वर जावे लागेल.

  • अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
  • वेबसाईट :- https://foscos.fssai.gov.in/
  • या वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला आपला व्यवसाय निवडावा लागेल .
  • आणि आपली कागदपत्रे अपलोड करावी लागतील
  • शेवटी आपल्याला प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पैसे भरावे लागेल.
  • ४ ते ५ दिवसानंतर आपल्याला आपले फूड लायसन्स याच वेबसाईट वर मिळून जाईल.

आपल्याला जर हे लायसन्स काढायचे असेल तर खाली व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तो सविस्तर पाहून त्याप्रमाणे आपण online apply करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *