July 27, 2024

आपल्या ग्रामपंचायत मधून कोणकोणते दाखले मिळतात.

आपल्याला शिक्षणासाठी किंवा कोणत्याही शासकीय कामासाठी ग्रामपंचायत दाखले घेणे आवश्यक असतात. आपल्याला माहित आहे का ? आपली ग्रामपंचायत कोणकोणते दाखले / प्रमाणपत्र तुम्हाला देते. आणि किती कालावधी मध्ये त्याचप्रमाणे किती फी आकारते हि सर्व माहिती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. यापैकी आता बरेसचे दाखले बंद करण्यात आलेले आहेत त्याकरिता आपल्याला स्वतः स्वयंघोषणपत्र दयावी लागतील त्याचे नमूने सुद्धा आपण पाहू. त्याचप्रमाणे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायत दाखले मिळवू शकता. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश – २०१५ च्या कलम ३ अन्वये ग्रामपंचायत मार्फत द्यावयाच्या सेवा खालीलप्रमाणे

१. जन्म नोंद दाखला  – येथे क्लीक करा

२. मृत्यू नोंद दाखला   – येथे क्लीक करा

३. विवाह नोंद दाखला  – येथे क्लीक करा

४. रहिवाशी दाखला     –  स्वयंघोषणापत्र 

५. दारिद्य रेषेखालील दाखला 

६. हयातीचा दाखला    –  स्वयंघोषणापत्र

७. ग्रामपंचायत येणे बाकी दाखला 

८. शौचालय दाखला   –  स्वयंघोषणापत्र

९. नमुना न ८ उतारा  – येथे क्लीक करा

१०. निराधार असल्याचा दाखला   –  स्वयंघोषणापत्र

११. विधवा असल्याचा दाखला –  स्वयंघोषणापत्र

१२. परित्यक्ता असल्याचा दाखला स्वयंघोषणापत्र

१३. विभक्त कुटुंबाचा दाखला –  स्वयंघोषणापत्र

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

वरील  प्रकारचे १३ दाखले आपल्याला ग्रामपंचायत मधून मिळत होते त्यापैकी आता खालील दाखले बंद करण्यात आले असून त्यासाठी आता आपल्याला  स्वयंघोषणपत्र देता येणार आहे. 

महसूल व वन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये “तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र” ही सेवा देण्यात येत असल्याने या विभागाकडून रहिवाशी दाखला देण्याची आवश्यकता नाही. तसेच 

(१) विधवा असल्याचा दाखला – यासाठी नवऱ्याच्या मृत्यु नोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वघोषणापत्र घेण्यात यावे.

 (२) परितक्त्या असल्याच्या दाखला – यासाठी मा.न्यायालयाचे अथवा सक्षम प्राधिकाऱ्याचे आदेशासोबत नवऱ्याने सोडल्याचे/ नवऱ्यास सोडल्याचे स्वघोषणापत्र घेण्यात यावे. 

(३) विभक्त कुटुंबाचा दाखला, 

(४) नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र, 

(५) बेरोजगार प्रमाणपत्र, 

(६) हयातीचा दाखला, 

(७) शौचालय दाखला, 

(८) नळजोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र, 

(९) चारित्र्याचा दाखला, 

(१०) वीजेच्या जोडणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, 

(१) जिल्हापरिषद फंडातून कृषी साहित्य खरेदी, 

(१२) राष्ट्रिय वायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम,

 (१३) बचतगटांना खेळते भागभांडवल बँकेमार्फत कर्ज पुरवठा, 

(१४) कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 

(१५) निराधार योजनेसाठी वयाचा दाखला देण्याच्या सेवा यापुढे बंद करण्यात येत असून यासंदर्भाने ग्रामस्थांकडून सोबत जोडलेल्या नमुन्यातील स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात यावे. शासन निर्णय  क्रमांकः आरटीएस-2018/प्र.क्र.145/आस्था.5

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *