October 4, 2023

Get Birth Certificate Online in Maharashtra

Get birth certificate online । birth certificate maharashtra | how to appy birth certificate | जन्म प्रमाणपत्र । जन्म नोंद दाखला

आपल्याला आपल्या जन्मांची नोंद आहे का नाही हे माहित असते, पण आपला जन्माचा दाखला त्यासाठी पुरावा असतो आपली जन्मतारीख दर्शविणारे, जन्मस्थळ, आपले नाव असा उल्लेख असणारा पुरावा म्हणजे जन्म पुरावा. जन्म दाखला आपल्याला आपला जन्म ज्या ठिकाणी झाला आहे . त्या ठिकाणच्या निंबंधक कार्यालयांमध्ये मिळतो. हे निबंधक कार्यालय कुठे कुठे असते. हे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या निबंधक कार्यालय मध्ये जन्म दाखला मिळतो.हा दाखला आपल्याला घरबसल्या सुद्धा मिळवता येतो तो आपण पाहूयात.

ऑनलाईन जन्म प्रमाणपत्र असे मिळवा

आपल्याला जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निबंधक कार्यालयांमध्ये जावे लागत असते,आणि त्यानंतर आपल्याला तेथे अर्ज दिल्यानंतर जन्म प्रमाणपत्र मिळते पण आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावे लागते. आता आपल्याला हि सुविधा घरबसल्या ऑनलाईन मिळवता येथे. हि सुविधा आपण अर्ज केल्यानंतर ५ दिवसाच्या कालावधी मध्ये मिळते. आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि जन्म प्रमाणपत्र मिळवावे पहा.

१) सर्वात प्रथम आपल्याला या लिंक ला भेट द्यावी लागेल https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en

२) त्यानंतर आपल्याला यावर नोंदणी करावी लागेल.

३) आपण नोंदणी केल्यानंतर लॉगिन करा.

४) त्यानंतर search मध्ये Rural Development and Panchayat Raj Department सर्च करा

५) त्यावर क्लिक करून आपण जन्म प्रमाणपत्र यावर क्लिक करा.

६) त्यानंतर आपण आपला जन्मस्थळ म्हणजे जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत सिलेक्ट करा

७) आपले नाव आणि त्यानंतर जन्मतारीख , आधार कार्ड नंबर टाकावे.

८) त्यानंतर aaply करा आणि . आपण प्रमाणपत्र फी भरा आपल्या अँप्लिकेशन नंबर मिळेल

९) पुन्हा आपण ५ दिवसानंतर याच पोर्टलवर येऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासा

१०) त्यानंतर आपला अर्ज पात्र झाल्यानंतर डाउनलोड यावर क्लिक करून प्रमाणपत्र मिळवा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

जन्म प्रमाणपत्राचे फायदे

 • बाळंतपणासाठी शासकीय फायदे
 • लसीकरण
 • शिधापत्रिकेत नाव नोंदणी करण्यासाठी
 • शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी
 • जातीचा दाखला मिळवण्यासाठी
 • रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी
 • कायदेशीर
 • पारपत्र घेण्यासाठी
 • आर्युर्विमा
 • मतदार नावनोंदणी
 • वाहनचालक परवाना
 • विमा, आजारपण विमा
 • नोकरी,शासकीय नोकरी
 • विवाह प्रमाणपत्र, विवाह

One thought on “Get Birth Certificate Online in Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Button माहितीसाठी जॉईन व्हा