December 13, 2024

Shop Act Licence ऑनलाईन कसे काढायचे २०२३

नमस्कार मित्रांनो आपले शॉप ( दुकान ) आहे का? Shop Act Licence Apply आपल्याला दुकान चालवण्यासाठी शॉप ऍक्ट लायसन्स हवे असते. हे लायसन्स कसे असते, कोठे मिळते, आणि आपण कसे मिळवायचे हे या लेखात आपण पाहणार आहोत.त्यामुळे सर्व माहिती सविस्तर वाचा..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शॉप ऍक्ट लायसन्स म्हणजे काय ?

आपल्याला व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप ऍक्ट लायसेन्स होय. कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप ऍक्ट लायसेन्सने होते. दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी , व्यवसायिक कर्ज मिळवण्यासाठी शॉप अधिनियम ( ऍक्ट) खूप महत्वाचे दस्तावेज आहे. हे लायसन्स आपण घरबसल्या मिळवू शकता ते कशा प्रकारे ते खालीलप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.

शॉप ऍक्ट लायसन्स मिळवण्यासाठी कागदपत्रे

ओळखीचा पुरावा (कोणताही -1)
1) पॅन कार्ड
2) पासपोर्ट
3) आधार कार्ड
4) ड्रायव्हिंग लायसन्स
५) निवडणूक/मतदार ओळखपत्र


पत्त्याचा पुरावा (कोणताही -1)
१) भाड्याची पावती
२) टेलिफोन बिल
3) वीज बिल
4) विक्री/खरेदी डीड
5) मालमत्ता कर भरलेली पावती
6) नोटरीकृत रजा आणि परवाना
7) सोसायटी देखभाल पावती


इतर कागदपत्रे
1) ज्या ठिकाणी आपले दुकान सुरु आहे किंवा सुरु करणार आहात त्या दुकानाचा नावासहित फोटो.
2) दुकान मालकाचा आय डी साईज फोटो

3)दुकान मालकाची स्वाक्षरी

शॉप ऍक्ट लायसन्स कसे मिळवायचे

आपल्याला घरबसल्या शॉप लायसन्स मिळवता येत तेही ऑनलाईन पद्धतीने, ते कसे मिळवायचे पहा.

शॉप ऍक्ट लायसेंस shop act licence ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे लागेल. तुम्ही ऑनलाईन नोंदणी केंद्रांमध्ये जाऊन तुमच्या दुकानाची माहिती भरू शकता. आपण तुमच्या लायसेंसासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि नोंदणी संबंधी सर्व माहिती देऊ शकता.

तुम्हाला लायसन्स हवं असेल आणि ते कसे बनवायचे याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ती पाहून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. खालील व्हिडिओ पहा आणि तुमचे शॉप ऍक्ट लायसन्स मिळवा.

येथे ऑनलाईन अर्ज करा

अर्ज करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा

या लिंक ला क्लिक करण्यापूर्वी आपल्याला आपले सरकार वरती लॉगिन करावे लागेल त्यानंतर आपल्याला या लिंक वर जात येणार आहे.

या वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला शॉप ऍक्ट लायसन्स काढता येणार आहे तेही फक्त २३ रुपयांमध्ये .

खालील प्रमाणे व्हिडिओ देण्यात आलेला आहे तो पहा आणि त्यापद्धतीने आपण शॉप ऍक्ट लायसन्स मिळवू शकता.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

shop act licence

shop act licence

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *