July 27, 2024

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे

आपल्या गावामध्ये स्थानिक स्वराज संस्था असते म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय यामध्ये आपल्या गावच्या लोकसंख्येनुसार सदस्य संख्या असते. या सदस्यांमधून गावचा प्रथम नागरिक सरपंच यांची निवड केली जाते. त्याचप्रमाणे उपसरपंच यांची सुद्धा सदस्यांमधून निवड केली जाते. पण आपल्याला जर ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच व्हायचे असेल तर आपल्याला त्यासाठी निवडणुकीला अर्ज करावा लागतो. दर पाच वर्षांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली जाते. यामध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो. त्यानंतर आपल्याला निवडून आल्यानंतर सदस्य होता येते. पण आपल्याला निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्याचबरोबर पात्रता ह्या सर्व माहिती नसते. खालीलप्रमाणे आपण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागतपत्रे पाहुयात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता

  • ती व्यक्ती भारतीय असावी.
  • त्या व्यक्तीचे वय २१ वर्ष पूर्ण असावे.
  • ग्रामपंचायत क्षेत्रात मतदार म्हणून त्या व्यक्तीचे नाव नोंदविलेले असावे.
  • त्या व्यक्तीकडे ग्रामपंचायत कोणताही कर थकबाकी नसावा.
  • तो व्यक्ती शासकीय कर्मचारी नसावा.
  • ती व्यक्ती गुन्हेगारी असेलेला नसावा.
  • २ पेक्षा जास्त अपत्य असू नये.
  • किमान ७ वी पास असावा.

आपल्याला आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागतपत्रे कोणती आहेत व ती डाउनलोड खालीलप्रमाणे करता येतील.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे

  1. विहित नमुन्यातील अर्ज
  2. मतदार यादीत ज्या पानांवर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेराक्स प्रत
  3. अनामत रक्कम पावती
  4. आधारकार्ड झेराक्स
  5. अपत्याचे स्वंय घोषणापत्र
  6. जातीचे प्रमाणपत्र
  7. जात पडताळणी प्रमाणपत्र  नसेल तर जात पडताळणीसाठी सादर केलेली पावती
  8. सादर पोहोच पावती बरोबर जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिन्याच्या आत सादर करावयाची हमीपत्र
  9. 21 वर्ष पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा जसे कि शाळा सोडल्याचा दाखला,सनद
  10. शौचालय असल्याबाबतचे व वापराबाबतचे घोषणापत्र
  11. मत्ता व दायित्च स्वंय घोषणापत्र म्हणजेच आपल्या नावावर असलेली प्रापर्टी
  12. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबत विहीत नमून्यातील प्रमाणपत्र
  13. मतदान कार्ड ओळखपत्र
  14. नवीन खाते काढलेल्या बॅकेचे पासबुक झेराक्स
  15. ठेकेदार नसल्याचे स्वंय घोषणपत्र
  16. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
  17. पासपोर्ट फोटो इ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *