November 21, 2024

अकरावी CET परीक्षेचा फॉर्म कसा भरावा?

आपण २०२१ मध्ये दहावी पास झाला आहात तर आपल्याला ११ मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म कसा भरावा त्याचबरोबर फॉर्म लिंक कोणती आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र CET अर्ज परीक्षा दिनांक

CET अर्ज सुरु दिनांक :- 20 जुलै २०२१ पासून सकाळी ११ नंतर

CET अर्ज सुरु दिनांक :- २६/०७/२०२१ ते ०२/०८/२०२१

CET परीक्षा दिनांक :- २१ ऑगस्ट २०२१

दिनांक २०/०७/२०२१ ते २१/०७/२०२१ या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व आवेदनपत्र भरताना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल. सदर प्रक्रियेदरम्यान परिपुर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, मात्र प्रक्रिया पूर्ण न करु शकलेल्या उमेदवारांचा तपशील संकेतस्थळावर नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

दहावीचा निकाल नुकताच १६ जुलै रोजी लागला असून हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. हा निकाल लागल्यानंतर आपल्याला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी CET परीक्षा द्यावी लागते . हि परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे. तसेच आपल्याला हि परीक्षा द्यायची आहे कि नाही हे वेबसाईट वर माहिती द्यावी लागणार आहे. तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८ /- रुपये भरावे लागणार आहे.

सदर प्रवेश परीक्षेसाठी दिनांक २६/०७/२०२१ ते ०२/०८/२०२१ रात्री ११:५९ वा. पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सवलत आहे.

परीक्षा शुल्क

महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे.

इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८/- रुपये भरावे लागणार आहे.

अर्ज कुठे भरावा

फॉर्म प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थी महाविद्यालयीन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करू शकतात. यानंतर, त्यांच्याकडे या साठी उपस्थित राहण्याचे किंवा न येण्याचे पर्याय त्यांच्याकडे असतील. त्यांना पाहिजे ते निवडू शकतात.

INSTAGRAM FOLLOW करा.

अर्ज येथे करा 👇 NEW

वेबसाईट तांत्रिक प्रॉब्लेम असल्यास पुन्हा प्रयत्न करा पुन्हा भेट द्या. वेबसाईट सुरु झाल्यानतर आपल्याला instagarm वर कळवण्यात येईल

विद्यार्थ्यांना सुचना

आपल्याला १० वी १२ वी नंतर पुढील शिक्षणासाठी तहसीलदार तसेच ग्रामपंचायत कार्यालातील कागदपत्रे घेणे आवश्यक असतात ते मिळवण्यासाठी खालील प्रमाणे माहिती देण्यात आलीली आहेत ती पहा.

  • तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शिक्षणसाठी ग्रामपंचायत तहसिल दाखले याबद्दल माहिती हवी असल्यास येथे क्लिक करा
  • तुम्हाला १० वी व बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे हवी असल्यास खालीलप्रमाणे सर्व कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. येथे क्लिक करा
  • रहिवाशी प्रमाणपत्र Pdf Download येथे क्लिक करा

One thought on “अकरावी CET परीक्षेचा फॉर्म कसा भरावा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *