१) नमुना ६ :- नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
२) नमुना ७ :- मतदार नोंदणी वगळणीसाठी आवश्यक कागदपत्रे.
२) नमुना ८ – मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
४) नमुना ८ अ :- एकाच मतदार संघातील मतदार एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात स्थलांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
नमुना ६ नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- १. आयडेंटीटी साईझ १ फोटो
- २. रहिवासी पुरावा :- ( खालीलपैकी एक )
रेशनकार्ड झेरॉक्स, वीज लाईट बिल, टिलिफोन बिल, भारतीय पासपोर्ट, भाडे करारपत्र,पाणी पट्टी बिल इ.
टीप :- लग्न झालेल्या मुलींचे बाबतीत रेशन कार्ड वर नाव नोंद मसल्स विवाह नोंद दाखल अथवा लग्न पत्रिका जोडावी.
- ३. जन्माचा पुरावा :- ( खालीलपैकी एक )
जन्म नोंद दाखला झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, ड्रायविंग लायसन्स झेरॉक्स, १०वी प्रमाणपत्र इ.
- ४. वय वर्ष २१ पेक्षा अधिक असलेस जोडपत्र ३ भरून जोडावे .
नमुना ७ – मतदार नोंदणी वगळणीसाठी आवश्यक कागदपत्रे.
- १. मयत मतदारांच्या बाबतीत मृत्यूनोंद दाखला जोडावा अथवा कुटूंबातील व्यक्तींचे जबाब जोडावे.
- २. स्थलांतरित मतदारांच्या बाबतीत ज्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत त्या ठिकाणचे रहिवासी पुरावा घ्यावे .
- ३. स्थलांतरित मुली / लग्न झालेल्या मुलींचे बाबतीत विवाह नोंद दःखला अथवा लग्न पत्रिका जोडावी.
- ४. दुबार नोंद असलेले मतदारांच्या बाबतीत त्याच केंद्रात अथवा इतर केंद्रात दुबार नोंद असलेली झेरॉक्स परत जोडावी.
नमुना ८ – मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
- १. जन्म तारीख दुरुस्ती :- ( खालीलपैकी एक )
जन्म नोंद दाखल झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, ड्रायविंग लायसेन्स झेरॉक्स, १० प्रमाणपत्र इ .
- २. छायाचित्र दुरुस्ती
आयडेंटिटी साईझ १ फोटो
- ३. पत्ता दुरुस्ती :- ( खालीलपैकी एक )
रेशनकार्ड झेरॉक्स, वीज बिल, टिलिफोन बिल,भारतीय पासपोर्ट, भाडे करारपत्र, पाणी पट्टी बिल ई.
- ४. मतदारांचे नाव अथवा नातेवाईंकाचे नाव अथवा नाते संबंध दुरुस्ती – ( खालीलपैकी एक )
रेशन कार्ड झेरॉक्स जन्म नोंद दाखल झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, ड्रायविंग लायसेन्स झेरॉक्स, १० प्रमाणपत्र इ .
नमुना ८ अ एकाच मतदार संघातील मतदार एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात स्थलांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
( महत्वाची सूचना – लग्न झालेल्या मुलींना हा अर्ज वापरू नये )
- 1. मतदार ज्या केंद्रात स्थलांतर होत आहे त्या केंद्रातील खालील पैकी एक रहिवासी पुरावा जोडावा.
2. रेशनकार्ड झेरॉक्स, वीज लाईट बिल, टिलिफोन बिल, भारतीय पासपोर्ट, भाडे करारपत्र,पाणी पट्टी बिल इ.