आपल्याला ग्रामपंचायत मध्ये वारस नोंद करायची असल्यास त्याचा अर्ज कसा लिहावा त्याचबरोबर त्याचे अर्जलेखन आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार याबद्दल माहिती घेणार आहे तसेच त्या अर्जाची PDF फाईल डाउनलोड मिळणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.
आपल्या घरातील एखादी व्यक्ती जिच्या नावे ग्रामपंचायत मिळकत घर किवा खुली जागा नोंद आहे. ती व्यक्ती जर मयत झाली असेल तर तिच्या नावच्या ग्रामपंचायत मिळकत घर किवा खुली ह्या त्याच्या वारसाच्या नावे नोंद होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात त्या मिळकती त्याच व्यक्तीच्या नावे राहतील. आपल्याला मयत व्यक्तीच्या नावच्या मिळकती त्यांच्या वारसांच्या नावे जर नोंद करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत ला १ अर्ज द्यावा लागेल. तो अर्ज कसा लिहावा तो खालीलप्रमाणे ..
अर्ज कसा लिहावा :-अर्ज लिहताना आपल्याला ग्रामपंचायत प्रमुख सरपंच व सचिव ग्रामसेवक यांच्या नावे लिहावा.
त्यानंतर ग्रामपंचायत चा पत्ता लिहावा.
विषय मध्ये वारसा नोंद होणेबाबत विषय लिहा.
त्यानंतर आपण जो कोणी अर्ज करणार आहात त्यांचे अर्जदार म्हणून नाव लिहावे.
तपशील मध्ये अशी माहिती लिहा कि आपल्या घरातील जि व्यक्ती मयत झाली त्याचा मृतू दिनांक व त्याच्या नावावरील मिळकतीचा उल्लेख करून त्यांचे कोण कोण वारस आहेत त्यांची नावे लिहा. आणि यांच्या नावावर मयत व्यक्तीच्या घर किवा खुली जागा नोंद करण्यात याव्या. असा अर्ज लिहा आणि खालीलप्रमाणे सर्व वारसदारांची नावे लिहा.
कागदपत्रे :-
मृतू दाखला व घरटाण उतारा जोडावा.
याचा नमुना जर आपल्याला हवा असेल तर खालील बाबी पहा.
download सूचना.
मित्रहो खाली तुम्हाला ग्रामपंचायत वारस नोंद download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
आणखीन अर्ज हवे असल्यास ग्रामपंचायत अर्ज याला click करा.