महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा चालु आहे. सरंपच निवडणुकीसाठी प्रचार चालु झाला आहे सर्व उमेदवार ग्रामपंचायत निवडणुक जिकण्याच्या रस्सीकेस मध्ये आहे. पण तुम्हाला माहित आहे का ग्रामपंचायत मध्ये आपण निवडुण आल्यानंतर आपल्याला किती मानधन आणि भत्ते मिळणार आहेत तर सरपंच, उपसरपंच त्याचप्रमाणे सदस्य यांना निवडुन आल्यानंतर मानधन व इतर काही भत्ते किती मिळतात पहा
महाराष्ट्रातील सरपंच संघटना यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व महागाईत झालेली वाढ तसेच सरपंचाच्या कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन सरपंच मानधनात वाढ दिनांक 30 जुलै 2019 च्या शासन निर्णयात घेण्यात आला .
यापुर्वी सरपंच यांना किती मानधन देण्यात येत होते पहा ,यामध्ये शासन किती टक्के अनुदान व उर्वरीत ग्रामपंचायत ग्रामनिधीमधून देण्यात येत होते.
यापुर्वीचे मानधन
ग्रामपंचायतीची लोकसंख्या वर्गवारी | मानधनाची दरमहा रक्कम रु | शासन अनुदान टक्केवारी | शासन अनुदानाची रक्कम |
1) 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | 1000 रुपये | 75% | 750 रुपये |
2) 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | 1500 रुपये | 75% | 1125 रुपये |
3) 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | 2000रुपये | 75% | 1500 रुपये |
सुधारित मानधन पहा
सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी 75 टक्के खर्च शासन उचलेल व उर्वरित 25 टक्के मानधनाची रककम संबंधित ग्रामपंचायत निधीमधून देण्यात येईल.
ग्रामपंचायतीच्या लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंचाना आणि उपसरपंचांना खालील मानधन अनज्ञेय राहील.
ग्रामंपचायतीची लोकसंख्या | सरपच मानधन दरमहा रुपये | उपसरपंच मानधन दरमहा रुपये | शासन अनुदान टक्केवारी | सरपंचाना शासन अनुदान रक्कम | उपसरपंचायना शासन अनुदान रक्कम |
1) 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | 3000 रुपये | 1000 रुपये | 75% | 2250 | 750 रु |
2) 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | 4000 रुपये | 1500 रुपये | 75% | 3000 रुपये | 1125 रु |
3) 8001 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायती | 5000 रुपये | 2000 रुपये | 75% | 3750 रुपये | 1500 रु |
सदस्य यांना मानधन
सदस्य यांना मासिक मानधन नसते तर त्यांना मासिक मिटींग भत्ता दिला जातो यामध्ये सरपंच व उपसरंपच यांना सुदधा मासिक मिटींग भत्ता दिला जातो पुर्वी ग्रामंपचायत सदस्य यांना मासिक मिटींग भत्ता म्हणून 25 रुपये इतका आता त्यामध्ये वाढ करुन 200 रुपये इतका करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत विषयी जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास मित्रहो तुम्ही खालील फेसबुक ग्रुप जाईन व्हा म्हणजे तुम्हाला नवनविन माहिती सर्वात अगोदर मिळेल
facebook group join :- https://www.facebook.com/groups/mygrampanchayat