प्रधानमंत्री पीक विमा योजना: खरीप व रब्बी हंगामासाठी पीकपेरा स्वयंघोषणापत्र Pik Pera Pdf Download
शेतकरी बंधूंनो, आपले शेती उत्पन्न नैसर्गिक आपत्तींमुळे सुरक्षित राहावे यासाठी भारत सरकारने “प्रधानमंत्री पीक विमा योजना” सुरू केली आहे. यात आपल्याला ऑनलाईन पीक विमा भरताना पीकपेरा अपलोड करावे लागते. यासाठी आपल्याला खरीप व रब्बी हंगामासाठी पीकपेरा नोंदवणे अत्यावश्यक आहे. पीकपेरा म्हणजे शेतात कोणते पीक, किती क्षेत्रात व कोणत्या तारखेला पेरले गेले याची नोंद पत्रक. खालीलप्रमाणे Pik Pera Pdf Download आपल्याला भेटून जाईल.
पीकपेरा घोषणापत्र म्हणजे काय?
पीकपेरा घोषणापत्र हे शेतकऱ्याने सादर केलेले एक स्वयघोषणापत्र आहे, ज्यात तो नमूद करतो की, आपल्या शेतीमध्ये कोणते पीक कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या तारखेला पेरले आहे. हे घोषणापत्रात आपल्याला लिहावे लागते.
या घोषणापत्रात खालील बाबी नमूद असतात:
- गावाचे नाव :
- गट क्रमांक :
- खाता क्रमांक :
- एकूण क्षेत्र (हेक्टर/आर) :
- पेरलेल्या पिकाचे नाव :
- लागवड (पेरणी) दिनांक :
खरीप हंगामासाठी पीकपेरा स्वयंघोषणापत्र
खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पेरणी केली जाते. उदाहरणार्थ: नाचणी,सोयाबीन, तूर, भात, इ. पिकांची पेरणी केली जाते.
पीकपेरा घोषणापत्र सादर करताना शेतकऱ्याने स्वतः लिहून त्यावर आपली स्वाक्षरी करावी लागते.
- खरीप पीकपेरा साठी सादर केलेल्या माहितीमध्ये आपण कोणत्याही प्रकारची चूक करू नये.
- आवश्यक कागदपत्रे: ७/१२ उतारा, ८-अ दाखला, बँक पासबुक
रब्बी हंगामासाठी पीकपेरा
रब्बी हंगामात हिवाळ्यातील पिकांची पेरणी होते. उदाहरणार्थ: गहू, हरभरा, कांदा, ज्वारी इत्यादी.
- रब्बी हंगामासाठी देखील वरीलप्रमाणे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
- फेरबदल झाल्यास किंवा चुकीची माहिती असल्यास शेतकरीच जबाबदार राहील.
- आवश्यक कागदपत्रे: ७/१२ उतारा, ८-अ दाखला, बँक पासबुक
पीकपेरा सादर करताना आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा
- ८-अ उतारा
- बँक पासबुक झेरॉक्स (पीक विमा भरपाईसाठी खात्याची माहिती)
- मोबाईल नंबर
पीक पेरा पीक विमा स्वयंघोषणापत्र downlod
शतकरी बंधुनो आपल्याला जर पीक विमा भरायचा असेल तर पीक विमा स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागते. पीक विमा भरण्यासाठी लागणारे pik pera praman patra आम्ही खाली उपलब्ध करून दिलेले आहे. याचा वापर करून आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता .
खरीप व रब्बी पीक पेरा Download
आपल्याला खालील प्रमाणे खरीप व रब्बी पीक पेरा घोषणापत्र व सामाइक जमीन घोषणापत्र डाउनलोड साठी उपलब्ध करून दिला त्याची pdf डाउनलोड करून घ्या .
खरीप पीक पेरा स्वयंघोषणापत्र | डाउनलोड |
रब्बी पीक पेरा स्वयंघोषणापत्र | डाउनलोड |
सामाईक खातेदार संमतीपत्र | डाउनलोड |
विमा लाभासाठी महत्त्व
✅ विमा दावा करताना पिकाचे प्रमाण, लागवडीची तारीख आणि पेरणीचे क्षेत्र हे महत्वाचे ठरते
✅ चुकीची माहिती दिल्यास विमा दावा नाकारला जाऊ शकतो
जर तुम्हाला हे घोषणापत्र भरताना अडचण येत असेल, तर खाली तुमचे प्रश्न जरूर विचारा – आम्ही मार्गदर्शन करू!
#पीकविमा #खरीपहंगाम #रब्बीहंगाम #शेतकरी #पिकपेरा #PradhanMantriFasalBimaYojana #CropInsurance #ShetiYojana