May 28, 2023

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अर्ज PDF DOWNLOAD

मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येणार आहे. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून प्रत्येक लाभार्थीला गाय म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे , कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामाची लाभ मिळवून देण्यात येईल.

गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे :- जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चार आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरूपेक्षा जात गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.

शेळीपालन शेड बांधणे :- शेळ्यामेंढ्याकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रीय खत म्हणून वापरले जाऊ शकेल शेळी हि गरीबाची गे समजली जाते. शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून १० शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही. १० शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेत मजुराला त्याचा फायदा होत नाही. हि बाब लक्षात घेता किमान २ शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल . एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटूंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पॅट अनुदान मजूर करण्यात येईल.

कुक्कुटपालन शेड बांधणे :- कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागात कुटूंबाना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक्य पोषक अशा प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो. मात्र निवारा चांगला नसल्याने कोंबड्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्याचे प्राण्यापासून संरक्षण होते प्रत्येक शेडला ४९,७६०/- रुपये खर्च अपेक्षित आहे. १०० पक्षी यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५०च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग :- शेतातील कचऱ्यावर कामोस्टिंगद्वारे प्रकिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रिय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. यांकरिता शेतात एक रचले जातात. २ ते ३ महिन्यात काळपट तपकिरी भुसभूशीत, महु , दुर्गन्धी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे.

GR DOWNLOAD LINK :- https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202102041247553216.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *