January 17, 2026
panchayat samiti nivdnuk

पंचायत समिती निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे अटी व नियम

मित्रानो स्थानिक स्वराज संस्थापंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करताना ठराविक कागदपत्रे, अटी व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी हि माहिती सुलभ मार्गदर्शक ठरेल. चला तर जाणून घेऊया नामांकन दाखल करताना कोणती कागदपत्रे व काय नियम अटी लागू होतात.

  • ती व्यक्ती भारतीय असावी.
  • त्या व्यक्तीचे वय २१ वर्ष पूर्ण असावे.
  • पंचायत समिती क्षेत्रात मतदार म्हणून त्या व्यक्तीचे नाव नोंदविलेले असावे.
  • त्या व्यक्तीकडे कोणताही कर थकबाकी नसावा.
  • तो व्यक्ती शासकीय कर्मचारी नसावा.
  • ती व्यक्ती गुन्हेगारी असेलेला नसावा.
  • २ पेक्षा जास्त अपत्य असू नये.
panchayat samiti nivdnuk

 पंचायत समिती निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे

१. नामनिर्देशन अर्ज (Nomination Form)

निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) कडे उपलब्ध  (संबंधित तहसील / निवडणूक कार्यालयातून )

२. उमेदवाराचे फोटो:

  • २ पासपोर्ट साईज रंगीत फोटो ( सोबत ४ ते ५ ठेवा )
  • अलीकडील व स्पष्ट असावेत

३. मतदार ओळखपत्राची छायाप्रत:

  • स्वतः त्या पंचायत समिती क्षेत्रातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक
  • मतदार ओळखपत्राची छायाप्रत जोडावी

४. मतदार यादीतील उतारा:

  • उमेदवाराचे नाव ज्या भागाच्या मतदार यादीत आहे, त्या यादीचा (तपशीलासह) अधिकृत उतारा.

( मतदार यादीतील नावाची नोंद असलेला पुरावा )

५. वयाचा पुरावा:

  • उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण झालेले असल्याचा दाखला. जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (ज्यावर जन्मतारीख असेल) यापैकी कोणतेही एक दाखला.

६. शपथपत्र (Affidavit):

हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नमुन्याप्रमाणे न्यायालयीन शपथवर हे भरावे लागते. यात खालील माहिती स्पष्ट असावी:

  • उमेदवारावर चालू असलेली कोणतीही गुन्हेगारी प्रकरणे.
  • उमेदवाराची एकूण संपत्ती व कर्ज.
  • शैक्षणिक पात्रता 
  • सध्या कोणत्याही सरकारी नोकरीत नसल्याचे प्रमाणपत्र.

७ . राजकीय पक्षाचा उमेदवार असल्यास (B Form)

  • मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवारी पत्र
  • स्वतंत्र उमेदवारांसाठी लागू नाही

८. आरक्षित जागेसाठी पुरावा:

  • SC / ST / OBC उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • महिलांसाठी विवाह प्रमाणपत्र (गरज असल्यास)

९. जामिन रक्कम (Deposit):

  • उमेदवारी दाखल करताना जामिन रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम थोडीफार बदलू शकते, परंतु साधारणतः:
    • सामान्य उमेदवार: ₹५००/-
    • अनुसूचित जात/जमात उमेदवार: ₹२५०/-

१०. ओळखपत्र म्हणून:
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यांची attested छायाप्रत जोडणे उपयुक्त ठरते.

११ . जात व आरक्षणासंबंधी कागदपत्रे (लागू असल्यास)

  • 6. जात प्रमाणपत्र
  • 7. जात वैधता प्रमाणपत्र (SC / ST / VJNT / OBC साठी आवश्यक)
  • 8. नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (OBC / VJNT साठी)

आवश्यक कागदपत्रे

  1. विहित नमुन्यातील अर्ज
  2. मतदार यादीत ज्या पानांवर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेराक्स प्रत
  3. अनामत रक्कम पावती
  4. आधारकार्ड झेराक्स
  5. अपत्याचे स्वंय घोषणापत्र
  6. जातीचे प्रमाणपत्र
  7. 21 वर्ष पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा जसे कि शाळा सोडल्याचा दाखला,सनद
  8. शौचालय असल्याबाबतचे व वापराबाबतचे घोषणापत्र
  9. मत्ता व दायित्च स्वंय घोषणापत्र म्हणजेच आपल्या नावावर असलेली प्रापर्टी
  10. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबत विहीत नमून्यातील प्रमाणपत्र
  11. मतदान कार्ड ओळखपत्र
  12. नवीन खाते काढलेल्या बॅकेचे पासबुक झेराक्स
  13. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
  14. पासपोर्ट फोटो इ.

⚖️ महत्वाच्या अटी व नियम

✔️ उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे
✔️ तो/ती त्या भागातील मतदार असणे आवश्यक
✔️ शासकीय नोकर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी नसावा
✔️ निवडणूक खर्च आयोगाने ठरवलेल्या मर्यादेत असावा
✔️ खर्चाचा तपशील वेळेत सादर करणे बंधनकारक
✔️ सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रत व मूळ कागदपत्रे अर्ज दाखल करताना दाखवणे आवश्यक
✔️ नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख निवडणूक आयोग ठरवतो

📌 महत्वाची सूचना

नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी:

  • सर्व कागदपत्र मूळ व छायाप्रत अशा दोन्ही स्वरूपात घेऊन जा.
  • शपथपत्र (Affidavit) काळजीपूर्वक व तंतोतंत भरा. यातील चुकीची माहिती गंभीर परिणाम घडवू शकते.
  • निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर अद्ययावत सूचना व नमुने नियमित तपासत राहा.
  • नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख चुकवू नका. शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.
  • जामिन रक्कम जमा करताना मिळालेला पावती क्रमांक नामांकन अर्जावर नक्की लिहा.
  • आशा आहे की, ही माहिती उमेदवारांसाठी उपयुक्त ठरेल. लोकशाही प्रक्रियेतील सहभागाबद्दल शुभेच्छा!

सूचना: ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. तुमच्या राज्याच्या स्थानिक निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत सूचना व नियमांनाच अंतिम महत्त्व आहे.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावे

पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

शासकीय कर्मचारी पंचायत समिती निवडणूक लढवू शकतो का?

नाही. शासकीय कर्मचारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी पंचायत समिती निवडणूक लढवू शकत नाही.

नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत कधीपर्यंत असते?

नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *