aadhar card la mobile no link kara gharbaslya | how to link aadhar card in mobile | aadhar card me mobile no jode
आपल्याला बऱ्याच कामासाठी आधारकार्ड गरजेचे असते. कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा बँकमध्ये आपल्याला आधार कार्ड अनिवार्य आहे. परंतु आधार कार्डला आपला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर आपल्याला आधारच्या सुविधा घेण्यास अडचीण येत असतात. उदा. otp आपल्याला प्रधानमंत्री शेतकरी योजनेची ekyc करताना सुद्धा आधार कार्ड लिंक करावे लागते परंतु आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यास otp येत नाही त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही.
आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी आपल्याला तालुका ठिकाणी आधार सेंटरला गर्दीमध्ये जाऊन आधारकार्डला मोबाईल लिंक करावा लागतो. यासाठी आपला खूप वेळ जातो . पण आता आपल्याला घरबसल्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करता येतो तेही गती सोप्या पद्धतीने. आधार कार्डला मोबाइल नंबर घरबसल्या कसे लिंक करायचे ते पहा.
१) आपल्याला इंडिया पोस्ट या वेबसाईट वर जावे लागेल . https://ccc.cept.gov.in/ServiceRequest/request.aspx
२) त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव टाईप करावे लागेल.
३) त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता टाईप करा.
४) पिनकोड टाईप करा.
५) आता तुमचा ई- मेल आणि मोबाईल नंबर नोंदवा.
६) आता तेथून IPPB – Aadhar service सेलेक्ट करा.
७) आता आपण मोबाईल नंबर लिंक ला सेलेक्ट करा.
८) तुमच्या मोबाईल वर otp जाईल तो भरा.
९) त्यानंतर तुम्हाला Request Ref No: येईल तो जपून ठेवा.
आता तुमची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. तुमच्या घर २ ते ३ दिवसात पोस्टमन येईल आणि घरबसल्या तुमच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून देईल. तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. अश्याप्रकारे आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करा. त्याचप्रकारे त्याचप्रकारे ५ वर्षापर्यंत लहान मुलांचे आधार कार्ड काढू शकता.
हेही वाचा …. आधार कार्ड दुरुस्ती अर्ज फॉर्म कसा भरावा.
हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here