December 3, 2024

मृत्यू प्रमाणपत्र कसे बनवायचे । How to Get Death Certificate Online in maharashtra

आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर. मृत्यू प्रमाणपत्र एक महत्वाचे प्रमाणपत्र आहे. या प्रमाणपत्राशिवाय आपल्याला मयत व्यक्तीच्या नावे असणार जमीन, मिळकत, इमारत, त्याचबरोबर त्याच्या बँक खात्यावर पैसे असल्यास मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्या नावावर इन्शुरन्स असेल तर आपल्याला मृत्यू प्रमाणपत्र गरजेचे असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मृत्यू प्रमाणपत्र असेल तरच आपल्याला वारस करता येतो, वारसांना त्याची पेन्शन , जीवन बिमा लाभ, बँक खात्यावरील पैसे, जमीन, घर हे सर्व मृत्यू प्रमाणपत्र असल्याशिवाय वारसांना नाही मिळत.

मृत्यू झाल्यानंतर २१ दिवसाच्या आता आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी आपल्याला कोणतीही फी दयावी लागत नाही.

ऑनलाईन मृत्यू नोंद कशी करावी?

  • सर्वात प्रथम सेंट्रल गव्हर्मेंट च्या वेबसाइट वर जा. येथे क्लीक करा
  • त्यावर अकाउंट बनवा
  • त्यानंतर लॉगिन करा
  • मृत्यू फॉर्म भर
  • फॉर्म संबंमिट करा
  • त्यासोबत पत्त्याच्या पुरावा किंवा आधार कार्ड जोडा जोड
  • फॉर्म प्रिंट करा
  • हा फॉर्म घेऊन आपल्या निबंधक कार्यालयामध्ये जावा. (ग्रामपंचायत)

अश्याप्रकारे आपण ऑनलाईन अर्ज करून मृत्यू प्रमाणपत्र मिळवू शकता हा फॉर्म दिल्यानंतर आपल्याला निबंधक कार्यालय मधून मृत्यू प्रमाणपत्र मिळेल किंवा आपण ऑनलाईन मिळवू शकता.

ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

व्यक्तीच्या मृत्यूनंतर २१ दिवसाच्या आत त्या व्यक्तीची मृत्यू नोंद करणे.यामध्ये आपल्याला खालील माहिती देणे आवश्यक आहेत.

  • मयत व्यक्ती संपूर्ण नांव ( आधार कार्ड )
  • त्यांच्या वडिलांचे संपूर्ण नाव
  • आईचे संपूर्ण नाव
  • मयत व्यक्तीच्या पतीचे/ पत्नीचे नाव
  • मयत व्यक्तीचा कायमचा पत्ता
  • मयत व्यक्तीचा मृत्यूसमीयाचा पत्ता
  • माहिती देणाऱ्याचे नाव व पत्ता

हि सर्व माहिती घेऊन आपण आपल्या निबंधक कार्यालय मध्ये जाऊन देणे गरजचे आहे.त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र निबंधक कार्यालमधून दिले जाते.

एक वर्षावरील मृत्यू नोंदणीसाठी लागणारी कागतपत्रे

  • विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टँम्प लावलेल अर्ज
  • ग्रामसेवक/ निंबंधक यांचा दाखला

अश्याप्रकारे आपण मृत्यू नोंद करू शकता अधिक माहितीसाठी आपण खालील व्हिडिओ पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *