December 4, 2024

दोन दुधाळ गाई ,म्हशीचे वाटप योजना २०२३

दोन दुधाळ गाई ,म्हशीचे वाटप योजना २०२३ । गाय म्हैस अनुदान २०२३ । गाय म्हैस अनुदान ऑनलाईन अर्ज २०२३

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो की, गाय म्हैस पालन योजना महाराष्ट्र मध्ये राबवली जाते पण याबद्दल आपल्याला काही माहिती असते का. तर पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासन यामार्फत दोन दुधाळ गाई ,म्हशीचे वाटप योजना राबवली जाते. हि योजना राज्यायस्तरीय व जिल्हास्तरीय अशी राबवली जाते व याचे ऑनलाईन फॉर्म भरले जातात. योजनेची आपण सविस्तर माहिती घेऊया या योजनेमध्ये आपल्याला किती खर्च येतो, शासन किती अनुदान देते, अटी,शर्ती, पात्रता व कागदपत्र कोणकोणती आहेत हे पाहूया.

या योजनेमधील अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य धरली जाईल.

  1. राज्यस्तरीय योजना – दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .

संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

टीप :

1.सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )

२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )

३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००
2जनावरांसाठी गोठा
3स्वयंचलित चारा कटाई यंत्र
4खाद्य साठविण्यासाठी शेड
5५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१
एकूण प्रकल्प किंमत८५,०६१

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के                                    ६३,७९६
1स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के                                    २१२६५. ३३
2शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के                                    ४२,५३१
2स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के                                    ४२,५३१

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) * सातबारा (अनिवार्य)

३) * ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) * आधारकार्ड (अनिवार्य )

६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहितीसाठी शासन निर्णय वाचा :- शासन निर्णय १ शासन निर्णय २

2. जिल्हास्तरीय योजना- दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे

योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे.
टीप :- १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..

लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1संकरित गाई /म्हशी चा गट – प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे८०,०००
2५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा५,०६१
एकूण प्रकल्प किंमत८५,०६१

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
1शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के                                    ६३,७९६

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे.

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) * सातबारा (अनिवार्य)

३) * ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड (अनिवार्य )

६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) ( असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

(१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा :

शासन निर्णय 1 पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *