आपले १८ वर्ष पूर्ण झाले असतील तर आपल्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यासाठी आपल्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले नाव आपल्या गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट सुद्धा असणे गरजेचे आहे. आपले जर नाव गावच्या मतदान यादीमध्ये समाविष्ट नसेल तर आपल्याला मतदान करता येत नाही. त्यामुळे आपले नाव मतदान यादीमध्ये आहे का ते कसे तपासायचे ते खालीलप्रमाणे पाहूया.
आपल्याला आपले नाव मतदान यादीमध्ये तपासणीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही आहे. आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवर मतदान यादी डाउनलोड करू शकता.
मतदान यादी कशी डाउनलोड करावी?
१) तुम्हाला खालील वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/
२) त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडावा लागेल.
३) आपला मतदार संघ म्हणजे तालुका निवडा
४) आपले गाव शोधा आणि सिलेक्ट करा .
५) कॅप्टचा भरा आणि शेवटी ओपन पी.डी.एफ. ला क्लिक करा
तुमच्या गावची मतदान यादी तुम्हाला ओपन झालेली दिसेल यामध्ये आपले नाव आहे का हे तुम्ही तपासा त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील नावे आहेत का ? हे सुद्धा आपण यादीमध्ये चेक करू शकता.
आपले जर यादीमध्ये नाव नसेल तर आपले मतदान कार्ड काढला नसाल तर त्यासाठी आपल्याला नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे यावर क्लीक करून अधिक माहिती घेऊ शकता.