December 13, 2024

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय ? त्याचे फायदे काय ?

“आभा हेल्थ कार्ड म्हणजे आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने नागरिकांची आरोग्य कुंडलीच आहे,” असे म्हणून नागरिकांना आभा हेल्थ कार्ड काढून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“आभा कार्ड सोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित सर्व माहिती नोंदवली जाणार आहे. या कार्डच्या साहाय्याने डॉक्टर तुमच्या आरोग्याचा सर्व डेटा पाहू शकणार . या कार्डद्वारे रुग्णाचा पूर्वीही दवाखान्याचा इतिहास अगदी सहज शोधू शकणार आहेत. यामुळे रुग्ण तसेच डॉक्टरांनाही याचा फायदा होणार आहे.

पण आभा हेल्थ कार्ड आहे तरी काय? आणि ते कसे काढायचे? या कार्डचे फायदे काय ? याची सर्व माहिती या लेखात पाहणार आहोत.

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय ?

आभा हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर Ayushman Bharat Helth Account . हे कार्ड डिजिटल स्वरूपात असणार आहे. यात नागरिकांच्या आरोग्याच्या सर्व नोंदी साठवल्या जाणार आहेत.

हे कार्ड आपले आधार कार्ड सारखे दिसणार आहे. यात आपला आधार वरचा फोटो , आपले नाव, आभा addres ,जन्मतारीख आणि मोबाईल नंबर असतो. यात आपला १४ अंकी नंबर असतो तो आभा नंबर होय. याच नंबरचा वापर करून डॉक्टर रुग्णाची माहिती पाहणार आहेत.

यात कोणत्या रुग्णावर कोणता इलाज झाला. कोणत्या आजारावर इलाज करण्यात आला ? तो कोणत्या दिवशी व कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला ? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणकोणती औषधे देण्यात आली ? रुग्णाला कोणता आजार झाला आहे? त्याच्यावर कोणता उपचार करण्यात आला? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला आहे. ही सम्पूर्ण माहिती या कार्ड मध्ये सेव्ह केली जाणार आहे.

या कार्डच्या १४ अंकी आभा नंबरचा वापर करून हॉस्पिटल तुमच्या सहमतीने तुमच्या आरोग्याचा डेटा पाहू शकणार आहेत. पण यात तुमची सहमती असणे तितकेच गरजेचे आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा या कार्डमधील तुमचा जुना डेटा डिलिट करता येणार आहे.

या कार्डचा तुमच्यासाठी फायदा म्हणजे आपण ज्यावेळी दवाखान्यात अडमिट होणार आहे. त्यावेळी पासून सर्व माहिती यात सेव्ह असणार आहे. पुढच्या वेळी पुन्हा आपण दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये गेलात तर आपल्याला पूर्वीच्या फाईल,चिट्टी,कोणता इलाज केला हि माहिती सांगायची गरज लागणार आहे. कारण तुमच्याकडे आभा कार्ड आहे.

हॉस्पटिलमध्ये आपण डॉक्टरांना आभा नंबर सांगितलं कि तुमचा पूर्वीचा आरोग्याची माहिती त्यांना पाहता येणार आहे. त्यामुळे तुमच्यावर लवकर इलाज केला जाईल. आणि तुम्हाला कोणतेही रिपोर्ट फाईल सापडली नसली तरी यात माहिती सेव्ह असणार आहे. यामुळे पुन्हा तुंहाला रिपोर्ट टेस्ट करण्याची गरज भासणार नाही. यामुळे पैसे आणि वेळ सुद्धा निश्चित वाचणार आहे.

आभा हेल्थ कार्ड कसे काढायचे?

आभा हेल्थ कार्ड आपण स्वतः काढू शकता. आपल्या मोबाईलच्या साहाय्याने आभा हेल्थ कार्ड दोन मिनिटात आधारच्या साहाय्याने काढू शकता. हे कसे काढायचे याचा व्हिडिओ आपण बनवला असून खालील प्रमाणे व्हिडिओ देण्यात आला असून तो पाहून आपले आभा कार्ड बनवून घ्या.

आभा हेल्थ कार्ड वेबसाईट

वेबसाईट :- https://abha.abdm.gov.in/abha/v3/

वरील प्रमाणे व्हिडिओ पाहून आपण आपले आभा हेल्थ कार्ड बनवून घ्या. आणि हि माहिती सर्वाना शेअर करायला विसरू नका.

आभा हेल्थ कार्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *