आपल्याला शेतीचा ७/१२ तसेच ८अ मिळवण्यासाठी तलाठी ऑफिसला जावे लागते. त्यानंतर आपल्याला तलाठी कार्यालयात ७/१२ आणि ८अ मिळवण्यासाठी विलंब करून ७/१२ मिळवावा लागतो, पण आपल्यला जर घरबसल्या ७/१२ उतारा व ८ अ उतारा हवा असल्यास मोफत व स्वाक्षरीने सुद्धा घेता येतो त्यासाठी खालीलप्रमाणे सर्व माहिती दिली आहे ती पहा.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने मोफत ७/१२ मिळवण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जावे लागेल. खालीलप्रमाणे ९ स्टेप पहा.
१. शासनाच्या वेबसाईट वर भेट द्यावी लागेल . येथे क्लिक करा
२. वेबसाईट वरील आपल्या महाराष्ट्र नकाश्यामधील आपला जिल्ह्यावर क्लिक करावे.
किंवा. विभाग निवडा मधून आपला विभाग निवडा
३. आपला जिल्हा निवडा.
४. आपला तालुका निवडा .
५. आपले जे गाव आहे ते निवडा
६. यानंतर आपल्याला आपले गाव ओपन झाल्यावर २ पद्धतीने आपला ७/१२ मिळवता येतो
अ ) आपल्या सर्वे नं/ गट नं लक्षात असेल तर तो टाकून
ब) आपले पहिले नाव मधील नाव , आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून
७. आपला गट नो निवडून घ्या आणि पुढे जा
८. आपला मोबाईल नो टाका आणि ७/१२ पहा यावर क्लीक करा
९. त्यानंतर Please enter Captcha. जसा आहे तसा भरा आणि verfy captcha करा
तुमचा ७/१२ मोफत ओपन होईल तो तुम्ही डाउनलोड करा. अश्याप्रकारे मोफत ७/१२ मिळून जाईल.
आपल्याला दिवसातून १ मोबाईलवरून ६ ७/१२ काढता येतील
वरील सर्व सेम पद्धत ८अ उतारा काढण्यासाठी आहे.
सहीने ७/१२ असा मिळवा
आपल्याला घरबसल्या सहीने ७/१२ व ८अ मिळवायचे असल्यास खालील स्टेप पहा.
१. शासनाच्या वेबसाईट वर जावे लागेल . येथे क्लीक करा.
२. यावर आल्यावर आपल्यला new user रेजिस्ट्रेशन यावर क्लीक करावे. येथे क्लिक करा
३. तो फॉर्म भरून आपल्यला पोर्टल वर user name आणि पासवर्ड तयार करायचे
४. त्यानंतर पुन्हा वेबसाईट वर आल्यावर आपल्यला user name आणि पासवर्ड ने लॉगिन व्हायचे .
५. सर्वप्रथम आपल्याला recharge amount मधून रुपये add करून घ्यावे.
६. digtial signed ७/१२ यावर क्लीक करून पुढे जावे
७. त्यानंतर आपला जिल्हा , तालुका , गाव , व ७/१२ नो टाकून पुढे जावे.
यानंतर आपल्यला ७/१२ सहीसहित ओपन होईल तो डाउनलोड करा. प्रत्येक ७/१२ व ८ व साठी १५ रुपये खर्च येईल .
आपल्याला ८अ मिळवण्यासाठी सेम प्रोसेस आहे. डिजिटल signed ८अ यावर क्लिक करून ८व डाउनलोड करून घेऊ शकता.