मित्रहो आपल्या सर्वाना माहित आहे की, प्रधानमंत्री किसान योजना ( PM Kisan ) या योजनेतून आपल्याला वर्षाला ६ हजार रुपयांचे अनुदान मिळते मग हि नवीन namo shetkari yojana कोणती योजना आहे त्यामधून आपल्या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा ६ हजार अनुदान मिळणार.
आपण आजच्या लेखात namo shetkari yojana जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजना याबद्दलची संपूर्ण माहिती.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कि, शेतकऱ्यांना भारत सरकारने प्रधानमंत्री किसान योजना हि योजना संपूर्ण भारत देशात लागू केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन एक योजना आणली आहे ती म्हणजे “नमो शेतकरी महासन्मान योजना”. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार मिळणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे आर्थिक साहाय्यासाठी महाराष्ट्र सरकारने “नमो शेतकरी महासन्मान योजना” सुरु केली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना वार्षिक ६०००/- अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी पी एम किसान योजनेतील शेतकरी पात्र असणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान योजनेची खालील प्रमाणे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला वर्षाला ६ हजार अनुदान मिळणार असून आपलयाला या योजनेची संपूर्ण माहिती आणि खालील प्रमाणे पहिला हप्ता मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत ते पहा.
नमो शेतकरी योजना योजनेची माहिती
नमो शेतकरी योजना | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना |
योजनेची घोषणा | सन – २०२३ |
योजनेला मान्यता | दि. १५ जून २०२३ |
लाभ कसा मिळणार | प्रति कुटुंब प्रति वर्षी – ६०००/-रुपये |
पात्र लाभार्थी कोण ? | शेतकरी हा महाराष्ट्राचा असावा ( पती-पत्नी व १८ वर्षाखालील अपत्य) |
नमो शेतकरी योजना वेबसाईट
विभाग | कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग | ||
लाभ कसा मिळणार | राज्य शासनामार्फत विकसित केल्या जाणऱ्या महा DBT पोर्टल द्वारे (राज्याचे कृषी विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग पोर्टल/प्र्नाम्ली मार्फत मिळणार ) | ||
निधी वाटप स्वरूप | हप्ता | कालावधी | रक्कम |
पहिला | एप्रिल ते जुलै | 2000/- | |
दुसरा | ऑगस्ट ते नोव्हेंबर | 2000/- | |
तिसरा | डिसेंबर ते मार्च | 2000/- |
माहितीसाठी येथे क्लिक करा
खर्चाचे पूरक विवरणपत्र | १७ जुलै २०२३ ( वित्त विभाग ) |
लेखाशीर्षास मान्यता | १७ जुलै २०२३ |
नमो योजनेसाठी बँक | बँक ऑफ महाराष्ट्र |
अर्ज कुठे करावा | PM किसान योजनेच्या पोर्टल वरती नोंदणी करावी यावरती नोंदणी केलेले लाभार्थी पात्र |
पहिला हप्ता कधी ? | ऑगस्ट २०२३ |
लाभासाठी आवश्यक 3 बाबी
•E-kyc – Yes
•Land Seeding – Yes
•Aadhar link _ Yes