राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान योजना राबवली असून यासाठी शासन प्रति किलो काजू बी साठी १ ० Kaju Bee Subsidy अनुदान देणार आहे . आपण जर काजू उत्पादक शेतकरी असाल तर हि Kaju Bee Subsidy कशी मिळवायची याबद्दल माहिती हवी असल्यास खालील प्रमाणे संपूर्ण माहिती मिळेल .
महाराष्ट्रातील कोकण विभाग व कोल्हापूर भागात काजू उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते . येतील शेतकऱ्यांनी काजूला बी ला हमीभाव मिळण्यासाठी अनेकी वेळा शासनाकडे मागणी केलेली आहे . पण हमीभाव देणे ही बाब केंद्र शासनाकडे आहे .
महाराष्ट्र राज्यातील काजू उत्पादक शेकऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाने काजू बी साठी प्रति किलो रु १ ० /- अनुदान जाहीर केलेले आहे . हे अनुदान शेतकरी कश्याप्रकारे घेऊ शकतात त्याचा अर्ज कसा करावा याबाबत व अनुदान कसे मिळवावे याबाबत आपण माहिती घेऊयात .
योजनेचे स्वरुप-
(१) काजू झाडापासून प्रति झाड सरासरी १० किलो काजू बी गृहित धरण्यात येईल.
(२) काजू यो साठी प्रति किलो रु.१०/-अनुदान मिळेल .
(३) किमान ५० किलो व कमाल २००० किलो या मर्यादेत.
योजनेचे लाभार्थी
राज्यातील काजू उत्पादक शेतकरी
योजनेची अंमलबजावणी
नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळ.
योजनेच्या अटी व शर्ती :-
(१) महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकरी पात्र असतील.
२) ७/१२ वर काजू लागवडीखालील क्षेत्र झाडांची नोंद असणे आवश्यक आहे.
(३) काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून झालेले उत्पादन कृषि विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणित करावे.
(४) संबंधित कृषी अधिकारी यांनी संबंधित शेतक-याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, काजू लागवडीखालील क्षेत्र, काजूच्या उत्पादनक्षम झाडांची संख्या व त्यापासून मिळालेले उत्पादन व आधार संलग्नित बँक खात्याचा क्रमांक इ. तपशीलाची नोंद घ्यावी.
(५) काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांच्याकडे काजू बी ची विक्री करणे आवश्यक आहे.
(६) काजू उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर उपरोक्त नमूद नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता असणे आवश्यक राहील.
(७) सदर योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, ७/१२ उतारा, आधार संलग्नित बचत बँक खात्याचा क्रमांकासह तपशील, संबंधित शेतक-यांच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून झालेले उत्पादन याबाबत संबंधित कृषि विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इ. तपशीलासह काजू मंडळाकडे अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
(८) कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यामधील संबंधित काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मूख्य/विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत.
अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत.
या दोन्ही कार्यालयांनीप्राप्त अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावेत
(९) पात्र लाभार्थी शेतक-यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर शासन अनुदानाची रक्कम महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल
काजू बी अनुदान मागणी अर्ज :- pdf Download
वरील प्रमाणे अर्ज डाउनलोड करून अर्ज भरून द्यायचा आहे . खालीलप्रमाणे व्हिडिओ बनवला असून आपण त्याप्रमाणे माहिती मिळवू शकता .
योजनेचा कालावधी-
सदर योजना सन २०२४ च्या काजू फळ पिकाच्या हंगामासाठी लागू राहील
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख दि. ३१/०८/२०२४