December 13, 2024

घरकुल योजना अपात्रते बाबतचे निकष

घरकुल योजना अपात्रते बाबतचे निकष । घरकुल ड योजना । घरकुल योजना २०२२ । सर्वाना घरकुल मिळणार २०२२ पर्यंत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या आपल्या गावागावात चर्चा चालू आहे ती घरकुलाबाबतची कोणाकोणाला २०२२ मध्ये घरकुल मंजूर होणार याबाबत आपण चर्चा ऐकली असाल. त्याचबरोबर गावागावमध्ये घरकुल ड सर्वे करण्यात आलेला होता. या ड सर्वेमधून आपल्या गावची ड यादी तयार करण्यात आलेली आहे. या ड यादीमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचा सर्वे करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा हि यादी ड घरकुल यादी म्हणून चर्चा चालू आहे. या यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी अजूनही ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. पण आपले जर घरकुल मध्ये नाव बसायचे असेल तर आपल्याला खालील अपात्रतेचे निकष आहेत, ते जाणून घेणे महत्वाचे आहेत.

घरकुला बाबत अपात्रते बाबतचे निकष खालील प्रमाणे :-

१)  पक्के घर आहे ( न न 8 नोंद असलेले वा नसलेले )

२ ) यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेण्यात आलेले

३ ) कायमस्वरूपी स्थलांतरित आहे

४ ) मयत व वारस नसणे

वरीलपैकी आपण जर असाल तर आपण अपात्र होता त्याचबरोबर खालील १३ बाबी आहेत ज्या घरकुल मिळण्यासाठी आपण अपात्र होऊ शकता.  

१) मोटरयुक्त दोन/ तीन /चारचाकी/मासेमारी बोट

२) यांत्रिक तीन/ चारचाकी कृषी उपकरणे

 ३) किसान क्रेडिट कार्ड सह 50000 किंवा त्यापेक्षा जास्त मर्यादा

४) कुटुंबातील कोणतेही व्यक्ती सदस्य सरकारी कर्मचारी आहे

५) अकृषिक कुटुंबे ज्यांची नोंदणी शासकीय उपक्रमात आहे

६) कुटुंबातील कोणताही सदस्य  दरमहा रुपये 10000 पेक्षा जास्त कमावतो आहे

७) आयकर भरणे 

८) व्यवसायिक कर भरणे

९ ) स्वतःचा रेफ्रिजरेटर असणे

१०) स्वतःचा लँडलाईन फोन असणे

११) 2.5  एकर किंवा त्यापेक्षा जास्त संचित जमिनीची मालकी त्याचबरोबर किमान एक सिंचन उपकरणे

१२) पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन असलेले 2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त संचित जमिनीची मालकी असणे

१३)  किमान 7.5 एकर किंवा अधिक सिंचन उपकरणांसह कमीत कमी सात पॉईंट पाच एकर जमिनीचे मालक असणे

हेही वाचा ………..

रमाई आवास घरकुल योजना 2021 pdf download येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *