June 29, 2025
bandhkam kamgar pension

बांधकाम कामगार पेन्शन योजना असा करा अर्ज

महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराची वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्यांना निवृत्तीवेतन बांधकाम कामगार पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना बांधकाम क्षेत्रातील पात्र कामगारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बांधकाम कामगार पेन्शन योजना महत्त्वपूर्ण आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजनेची पात्रता

  1. वय वर्ष 60 पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांसाठी ही योजना लागू आहे.
  2. बांधकाम कामगाराने किमान 10 वर्षे मंडळाकडे नोंदणी केली असल्यास तो पात्र ठरतो.
  3. पती-पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील, तर दोघांनाही स्वतंत्र लाभ मिळू शकतो.
  4. कामगाराचा मृत्यू झाल्यास, पती अथवा पत्नीला वारस म्हणून लाभ मिळवता येतो.
  5. ESI (कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८) किंवा PF (कर्मचाऱ्यांचे प्राविडेंट फंड कायदा, १९५२) अंतर्गत लाभ घेणारे कामगार पात्र नाहीत.

निवृत्तीवेतनाचे प्रमाण

अ.क्रनोंदणी वर्षे (महामंडळाकडे)दरवर्षी मिळणारे निवृत्तीवेतन
110 वर्षे₹6,000 (50%)
215 वर्षे₹9,000 (75%)
320 वर्षे₹12,000 (100%)

टीप: कामगार उपकराच्या आढाव्यानुसार शासन स्तरावर हे प्रमाण बदलू शकते

 अर्ज प्रक्रिया

  1. अर्ज mahabocw.in या अधिकृत वेबसाइटवरून प्रपत्र-अ डाऊनलोड करावा.
  2. प्रपत्रासोबत जोडायचे कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • जन्मतारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला
  •  बँक पासबुकची प्रत 

3. अर्ज सादरीकरण

वरील अर्ज व कागदपत्रे  संबंधित जिल्हा कामगार संदर्भ केंद्र (WFC) मधील प्रभारी अधिकाऱ्याकडे सर्व कागदपत्रे सादर करा.

4. पेन्शन सुरू होण्याची प्रक्रिया

  •   मंडळाकडून “निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र” (प्रपत्र-ड) जारी केले जाते.  
  •   दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला (प्रपत्र-इ) सादर करावा लागेल.  
  •   प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत, लाभार्थ्यांच्या खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे निवृत्तीवेतन जमा होते.
bandhkam kamgar nivruttivetan arj

 महत्वाचे प्रपत्रे:

  • प्रपत्र-अ: अर्ज नमुना Downlaod
  • प्रपत्र-ब: पात्रता प्रमाणपत्र
  • प्रपत्र-क: वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र
  • प्रपत्र-ड: निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र
  • प्रपत्र-इ: जिवंत असल्याचा पुरावा

महत्त्वाचे सूचना  

बँक खाते बदलणे/मृत्यू नोंदणी

  संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांकडे लिखित अर्ज सादर करावा.  

अधिक माहितीकरिता

अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा बांधकाम कामगार सेवा केंद्राशी किंवा mahabocw.in संकेतस्थळाशी संपर्क साधू शकता.

ही योजना बांधकाम कामगारांच्या कष्टाचा आदर आणि त्यांना निवृत्तीवेतन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पात्र कामगारांनी नक्कीच या पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा!”  

श्रम कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन. 

नोंद – वरील माहिती शासन निर्णयाच्या आधारे देण्यात आली आहे. अद्ययावत बदलांसाठी अधिकृत स्रोतांचा संदर्भ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *