October 4, 2023

नवीन घर बांधकाम ग्रामपंचायतीला कसे नोंद करावे अर्ज PDF Download

   

आपण जर गामपंचायत हद्दीमध्ये नवीन घर बांधकाम केले असेल किंवा जुने घर दुरुस्ती केला असाल तर ते घर आपल्या नावे मालक सदरी नोंद करावे लागते.

तर मित्रहो आपल्यला ते घर नोंद होण्यासाठी ग्रापंचायतीला सरपंच ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो . त्यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जाते . त्यामध्ये आपण दिलेला अर्जाचे वाचन केले जाते योग्य ती कागदपत्र पहिली जातात त्यानंतर आपला अर्ज मजूर केला जातो . त्यानंतर अपलाल्या आपल्या नावाचा ग्रामपंचात घरठाण उतारा मिळाला जातो

त्यासाठी आपल्याला जो अर्ज लिहावा लागतो त्याचा अर्ज नमुना त्याचबरोबर अर्ज डाउनलोड उपलब्ध केला आहे तो डाउनलोड करा

अर्ज कसा लिहावा

 विषयः-  नवीन घराची / घर दुरूस्ती /  घरकुल नोंद ग्रामपंचायत दप्तरी होणेबाबत.

              वरील विषयास  अनुसरून आपणास, विनंती अर्ज करणेत येतो की, मी माझ्या स्वतःच्या मालकीच्या सर्व्हे नं. / गट नं. / ——- मिळकत नं.——-मध्ये नवीन घर बांधकाम / घर दुरुस्ती / घरकुल बांधकाम सन                  मध्ये केलेले आहे.

                        मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे

1) घराची दिशाः- पुर्वाभिमुखी / पश्चिमाभिमुखी / दक्षिणाभिमुखी / उत्तराभिमुखी

2) घराची लांबी ———- रुंदी ——— = ————–चौफुट

3) मिळकत वर्णन  :-   

                1) दगड विटा मातीचे / कुडामतीचे घर

2) दगड विटा वाळु सिमेंट यांचे लोंखडी / सिमेंट पत्राचे घर / कौलारु घर

3) आर.सी.सी इमारत

4) इमारतीचा व्हरांडा / पडवी / सोपा / शौचालय                      

    वरीलप्रमाणे सदर मिळकतीचे वर्णन असुन सदर नवीन घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करणेत यावी व घरठान उतारा मिळावा हि नम्र विनंती ,

सोबत आवश्यक कागदपत्र खालीलप्रमाणे.

  1. घरटान उतारा / जागेचा 7/12 / खाते उतारा
  2. खरेदी पत्र / खरेदी खत /बक्षिस पत्र
  3. आणेवारी संमती पत्र
  4. चतुःसिमा (100 रु स्टँप)

ग्रा.पं. सदस्य :-1) ———————————————–

          2) ———————————————–

                                                                            आपला विश्वासू

                                         अर्जदाराचे नांव :- ——————————–

वरील प्रमाणे आपल्याला अर्ज लिहावा लागतो आणि त्यावर आपण अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे.

download सूचना.

मित्रहो खाली तुम्हाला घर नोंद अर्ज download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

12 thoughts on “नवीन घर बांधकाम ग्रामपंचायतीला कसे नोंद करावे अर्ज PDF Download

  1. माझे घर २००८ / २००९ साली बाधले. त्यावेळीं ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. तसे लेटर आहे.माझे घर निवासी ( शेजघर ) असुन ते माती,विटा व सिमेंट गिलावा करून तयार केलेले आहे घराचे क्षेत्रफळ ८५८ कर्वे फुट आहे ( २६’ × ३३’ )घर बांधले तेव्हापासून घरपट्टी चुकीची लावलेली आहे हे मी ग्रामसेवक व सरपंच यांचे निदर्शनास आणले तोंडी विनंती केली पण कोणीच बोलायला तयार नाही ‌शेवटी २०१५ साली अर्ज करुन मी माझे म्हणणे सांगितले तरीसुद्धा ते आपले म्हणणे रेटत होते.मी त्यांना म्हणालो की कदाचित तुमचे म्हणणे बरोबर असेल मग तूम्हि जी १४१० ₹ घरपट्टी आकारत आहात ती कोणत्या पद्धतीने आकारत आहात ते तरी मला सांगा ,त्याचे उत्तर ते देत नाहीत.
    ३/४ महीन्यापुर्वी मी उप सरपंचांना भेटलो त्यावेळीं ग्रामपंचायतीचे रजीस्टर त्यांच्या सम्मतीने पाहिले व मला धक्काच बसला कारण माझ्या घराची नोंदच नाही २००८/०९ , २००९ /१० , २०१० /११ , २०११ /१२ प्रती वर्षि १४१० ₹ व २०१२/ १३ , २०१३ /१४ , २०१४ / १५ प्रती वर्षी ३०७० ₹
    मग २००८ ते २०१५ पर्यंत भरलैले पैसे कुठे गेले . पैसे जमा केले त्याच्या पावत्या माझ्याकडे आहेत असे होऊनही घराची नोंद होत नाही.
    अर्ज देऊन ६ वर्ष झाली तरी हि स्पष्टिकरण केले नाही वरति अल्लाच्या सव्वा पैसे भरा म्हणतात

  2. सर, आम्ही दोन गुंठे गावठाण जागेवर मालकाचे संमती पत्र घेऊन नविन घर बांधले. जागेचे पैसे दिले पण मालकाचा जमीनीचा मोठा प्लाॅट असल्याने ते नावावर करू शकत नाही म्हणाला आणि तुम्हाला कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी संमती देत आहे म्हणाला.त्यामुळे ती जागा कायमस्वरूपी तुमची झाली म्हणाला पण नंतर आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आम्हाला लाईट व घरपट्टी येते आणि आता पाच वर्षे झाली तरी हे घर कायमस्वरूपी आमचे झाले का?

    1. तुम्ही खरेदी केला पाहिजे होता तुमचे फक्त ग्रामपंचायत ला नाव लागले आहे पण तुम्ही रीतसर खरेदी करा.

  3. आमची सन २०१० मध्ये तोंडी वाटणी झाली. वडिलांनी सर्व स्थावर मालमत्ता प्रत्येकाच्या नवे हयात असतांना केलेली होती. पण काही कर्ज प्रकरणी वरील स्थावर मालमत्ता अंतर्गत पुन्हा वाटणी करायचे ठरवले व तसे केले व रु.२०० च्या स्टंप स्टंप पेपरवर वाटणी सर्व अंतर्गत बदलासह वाटणी पत्र सर्वांच्या मते दोन साक्शिदारासमोर बनविले आहे. ते नोंदणी केलेले नाही. आता आम्हास ते सर्व सरकारी दफ्तरात बदल करून घ्यावयाचा आहे. तर ते वाटणीपत्र अर्जासोबत जोडून करता येईंल का? आमच्यापैकी एका भावाने पुढारी असल्यामुळे त्यात मध्ये नमुना नं. ८ वर नांवे बदल करून घेतला आहे. त्यामुळे सिटी सर्वे उतारा, नमुना नं. ८ व ग्रामपंचायत कर पावती मध्ये तफावत दिसत आहे. तर कोणाकडे अर्ज करून हे सर्व दुरुस्त करावे? म्हणजे वाटणी पत्र , सिटी सर्वे उतारा, ग्रा.प. नमुना ८ , व ग्रा.प. कर पावती मध्ये सुसंगत येईल. कोणता उतारा सर्वात जास्त ग्राह्य धरावा?

  4. पुण्यात हडपसर येथे माझी जागा आसून नवीन घराची ग्राम पंचायत ला नोंदणी करू शकतो का… की महानगर पालिका ला करावे लागेल.
    ते कसा पद्दितने करावे लागेल…

    1. तुमची जागेचा ७/१२ पहा कोणत्या ठिकाणचा आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत येत असेल तर तिथे नोंद करावी.

  5. सर मी एक घराचा पाया खरेदी केला त्याचे ग्रामपंचायत ला नोंद पण माझ्या नावे झाली पण तो पाया 7/12 ऊत्यारात आहे व तो 7/12 दुसर्‍या व्यक्तीला विकला गेला तो 11 गुंठे आहे माझी जागा 3 गुंठे आहे तरा मला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का

  6. Sir maze Ghar gavthan madhye Mazi aatya chi porach Tyana alag jamin mapun dileli aahe tari maza jamin madhye tich aardh Ghar aahe te kadaych tar kay hoyil ka 7/12 maza nava varti aahe tyanch alag aahe 7/12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Button माहितीसाठी जॉईन व्हा