जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी विभाग ५० टक्के अनुदानावर योजना अर्ज

मित्रांनो आपल्याला अनेक प्रकारच्या योजना जिल्हा परिषद सेस फंडातून ५ ० टक्के अनुदानावर मिळत असतात . यामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी विभागकडून रोटावेटर,पॉवर विडर, पॉवर टिलर,पी.व्ही.सी.पाईप व इंजिन,बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप ,पाचटकुट्टी/मल्चर मशीन हे मिळत असते. यासाठी आपल्याला अर्ज करावा लागतो तो कसा ते पाहूया जिल्हा परिषद कोल्हापूर.

योजनेचा उद्देश काय आहे?

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या जलसिंचन साधनांवर आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत 50% अनुदानावर इलेक्ट्रीक मोटर / इंजिन,रोटावेटर,पॉवर विडर, पॉवर टिलर,पी.व्ही.सी.पाईप पुरवण्याची योजना सुरू आहे.

यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेवर शेताची कामे करता येईल व शेतीचे उत्पादन वाढेल.

या योजनेत कोण पात्र आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी असाव्यात:

  • अर्जदार अत्यल्प भूधारक/अल्प भूधारक/महिला/इतर शेतकरी असावा.
  • त्याच्या नावावर जमीन (८ अ उतारा) असावा.
  • आधार क्रमांक व बँक खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे.
  • महिला शेतकरी, अल्प भूधारक, SC/ST वर्गास प्राधान्य दिले जाते.
  • योजनेत पूर्वी लाभ घेतलेला नसावा.
  • खालील अर्ज pdf डाउनलोड करा त्यामध्ये प्रत्येक साहित्यावर पात्रता दिलेली आहे .

मागणी अर्जासाठी लागणारी कागदपत्रे

  1. ८ अ उतारा (जमिनीची मालकी दर्शविणारा)
  2. ७/१२ उतारा
  3. आधार कार्ड झेरॉक्स
  4. बँक पासबुक झेरॉक्स (IFSC कोडसहित)
  5. लाइट बिल / डिपॉझिट पावती
  6. अपंगत्व प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  7. खालील अर्ज pdf डाउनलोड करा त्यामध्ये प्रत्येक साहित्यावर कागदपत्रे दिलेली आहे .

अर्ज कसा करायचा?

शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी (गटविकास अधिकारी वर्ग-1) यांच्याकडे खाली दिलेल्या नमुन्यातून अर्ज सादर करावा.

अर्जामध्ये खालील माहिती भरावी:

  • पूर्ण नाव, गाव, तालुका
  • जमीन तपशील
  • विहीर/बोअरवेल माहिती ( लागू असल्यास )
  • ट्रॅक्टरची माहिती किंवा आपल्याला पाईप इंजिन हवे असल्यास ती ताहिती
  • सामाजिक व जमीन धारणेनुसार वर्गवारी
  • संपर्क क्रमांक व बँक तपशील

अर्ज डाउनलोड करा

यंत्र सामुग्रीचे नाव अर्ज Download
1. इले. मोटार/ इंजिन Download Here
2. रोटावेटर,पॉवर विडर, पॉवर टिलरDownload Here
३.पी.व्ही.सी.पाईपDownload Here
४. बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप Download Here
५ . पाचटकुट्टी/मल्चर मशीन Download Here

किती अनुदान मिळते?

योजनेअंतर्गत 50% अनुदान दिले जाते. उर्वरित 50% खर्च शेतकऱ्यांनी स्वतः भरावा लागतो. हे अनुदान DBT (Direct Benefit Transfer) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते.

अश्याप्रकारे आपण जिल्हा परिषद सेस फंडातून ५ ० टक्के अनुदानावर अर्ज करून यंत्रसामुग्री मिळवू शकता .


AgriStack idcard
शेतकरी आयडी कार्ड
शेतकरी आयडी : ________
नाव : ________
गाव : ________
तालुका : ________
जिल्हा : ________
जन्मतारीख : ________
मोबाईल : ________

सूचना

  • हे ओळखपत्र AgriStack अंतर्गत देण्यात आले नाही.
  • यामध्ये नमूद केलेली माहिती तुम्ही स्वतः भरलेली आहे.
  • हे कार्ड कोठेही वापरता येणार नाही.
  • फक्त आपल्याकडे AgriStack क्रमांक जतनसाठी बनविले आहे.
sagar suryawanshi: