महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ही ग्रामीण भागातील गरिब लोकांना रोजगार देणारी महत्त्वाची योजना आहे. पण बऱ्याच लोकांना हे माहित नसते की घरकुल (PMAY-G) योजनेतून घर बांधताना सुद्धा मनरेगाच्या मजुरीचा लाभ मिळू शकतो. हा लाभ कसा मिळवायचा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत .
मनरेगातून घरकुलासाठी पैसे कसे मिळतात?
- प्रधानमंत्री घरकुल आवास अंतर्गत घरकुल मंजूर झाल्यावर तुम्ही तुमच्या कुटुंबासह स्वतः बांधकामात श्रमदान करू शकता.
- हे श्रम मनरेगा योजनेअंतर्गत नोंदवले जातात, आणि त्याचे पैसे सरकारी मजुरीच्या दरानुसार तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
- यासाठी आपल्या कुटुंबाकडे जॉब कार्ड असणे अनिवार्य आहे.
जॉब कार्ड कसे काढावे यासाठी येथे क्लिक करा
लागणारी पात्रता आणि प्रक्रिया:
- जॉब कार्ड असणे आवश्यक.
- प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत (PMAY-G) यादीत नाव असणे.
- काम सुरू करण्यापूर्वी ग्रामसेवक/रोजगार सेवक यांना माहिती द्या.
- आपल्या कडे कमीत कमी ८ लोक मजूर म्हणून आवश्यक.
- कामाच्या दरम्यान तुमची व त्यांची हजेरी दररोज नोंदवा.
- काम केलेल्या दिवसांचे पैसे बँकेत जमा होतात.
किती मजुरी मिळू शकते?
- 90 दिवसांची मजुरी मिळू शकते.
- एका दिवसाला मजुरी ₹297 ते ₹312 दर आहे. (दर बदलत असतो ).
- एकूण आपल्याला ₹26730 – ₹28,080 पर्यंतचा लाभ योजनेतून मिळू शकतो.
- यामध्ये मजुरांच्या खात्यावर त्याच्या हजेरीनुसार पैसे येतात.
कोणते काम मनरेगात येते?
- पाया खोदकाम व भूमिपूजन
- वाळू, माती, विटा वाहतूक
- बांधकामाचे सहाय्यक काम
- गवंड्याना लागणारी मदत
- घराभोवतालच्या परिसराची सफाई
रोजगार हमी रोजगार मागणीचा अर्ज – नमुना ४ खालीलप्रमाणे download करा
ग्रामरोजगार सेवक महत्वाचा दुवा
आपल्याला घरकुल मजूर झाल्यानतर रोजगार सेवककडे आपली जॉब कार्ड प्रत व मजुरांची नवे द्यावी लागतील. आपल्या घराच्या प्रगतीनुसार वेळेवर मस्टर काढून घ्यावे लागेल.तसेच घराच्या प्रगतीनुसार घराचे फोटो त्यांना द्यावे लागतील . यानंतर रोजगार सेवक मस्टर काढून तुमची हजेरीनुसार त्यांची नोंद घेतील. यानंतर आपल्याला मजुरांच्या खात्यावर पैसे येतील. यासाठी आपल्या गावच्या रोजगार सेवककडे सपर्क करा.
घरकुल लाभार्थीचा अश्या प्रकारे फोटो घ्यावे लागतात.
📌 महत्वाचे टीप:
- हा लाभ पूर्णतः मोफत आहे. कोणतीही फी नाही.
- कोणी पैसे मागितल्यास ग्रामसेवक किंवा BDO कार्यालयात तक्रार करा.
- बँक खाते व आधार लिंक असणे आवश्यक आहे.
📞 अधिक माहिती साठी संपर्क करा:
- ग्रामपंचायत कार्यालय
- रोजगार सेवक / ग्रामसेवक
- PMAY-G व MGNREGA अधिकृत वेबसाईट: https://nrega.nic.in
📝 निष्कर्ष:
मनरेगा योजना ही तुमच्या घरकुल बांधणीसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तुमच्याकडे जॉब कार्ड असल्यास आणि PMAY-G यादीत नाव असेल, तर स्वतः काम करून सरकारकडून मजुरीचे २८०००रु पर्यत अनुदान मिळवू शकता आणि तुमचे घर साकार करा.