Goverment 10 ID Card : सरकारची हि १ ० कार्ड सर्वांकडे असली पाहिजे

Goverment 10 ID Card : आपल्याकडे सरकारची अनेक प्रकारची कार्ड असतील. त्यापैकी अनेक कार्ड हि आपल्याला दस्तऐवज म्हणून वापर करावा लागतो . तर अनेक कार्ड हि शासकीय योजनेसाठी उपयुक्त ठरतात. अशी अनेक प्रकारची सरकारची कार्ड आहेत.

त्यापैकी Goverment 10 ID Card अशी कार्ड आहेत जी अत्यंत महत्वाची आहेत आणि ती सर्वाकडे असली पाहिजेत त्याबद्दल आजच्या लेखात आपण माहिती घेणार आहोत.

Goverment 10 ID Card जी आपल्याकडे असली पाहिजेत ती कोणकोणती ते खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहेत .

१ )आभा कार्ड

आभा हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर Ayushman Bharat Helth Account.

हे कार्ड आपले आधार कार्ड सारखे दिसणार आहे. यात कोणत्या रुग्णावर कोणता इलाज झाला. कोणत्या आजारावर इलाज करण्यात आला ? तो कोणत्या दिवशी व कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला ? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणकोणती औषधे देण्यात आली ? रुग्णाला कोणता आजार झाला आहे? त्याच्यावर कोणता उपचार करण्यात आला? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला आहे. ही सम्पूर्ण माहिती या कार्ड मध्ये सेव्ह केली जाणार आहे.

या कार्डचा तुमच्यासाठी फायदा म्हणजे आपण ज्यावेळी दवाखान्यात अडमिट होणार आहे. त्यावेळी पासून सर्व माहिती यात सेव्ह असणार आहे. पुढच्या वेळी पुन्हा आपण दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये गेलात तर आपल्याला पूर्वीच्या फाईल,चिट्टी,कोणता इलाज केला हि माहिती सांगायची गरज लागणार आहे. कारण तुमच्याकडे आभा कार्ड आहे. यामुळे पैसे आणि वेळ सुद्धा निश्चित वाचणार आहे.

२ )आयुष्मान कार्ड

आयुष्मान कार्डला गोल्डन कार्ड असेहीम्हटले जाते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना असेही कार्डवर आहे.

या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड आहे. त्यांना सरकारी आणि रजिस्टर खाजगी रुग्णालयात ५ लाखापर्यंत मोफत उपचार करता येईल. सरकारी रुग्णायालयात दाखल झाल्यानंतर पुढील १५ दिवसापर्यंत सरकार यावर खर्च करणार आहे. या योजनेमध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. हि योजना कॅशलेस असून उपचारासाठी आपल्याला १ रुपया हि खर्च करावा लागणार नाही.

आयुष्यमान कार्ड बद्दलची अधिकची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा Aayushman Bharat Card

३ ) ई श्रम कार्ड

केंद्र सरकार व रोजगार मंत्राालय भारत सरकार कडून असंगठित श्रमीक कामगार माहिती गोळा करण्यासाठी ई श्रम कार्ड तयार करण्याची सुरवात 26 ऑगष्ट 2021 पासून सुरु केली आहे. या योजनेमध्ये गंवडी, सुतार,लोहार, प्लंबर, शेतकरी मजूर, भाजी विक्रेता, रिक्षाचालक असे भरपुर कामगारांची नोदणी ? आपण करु शकता. अशा अनेक कामगारांसाठी ‘श्रमिक कार्ड योजना’ सुरवात केलेली आहे.

याचा फायदा आपल्याला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत 2 लाखांचा फ्री विमा तसेच अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुयांची मदत. आणि पेन्शन योजनेमध्ये लाभ सुद्धा मिळवता येतो याबद्दल अधिकची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा Eshram Card

४ ) प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन

ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे ज्या अंतर्गत ग्राहकाला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा रु. ३०००/- किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल आणि जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर लाभार्थीच्या जोडीदारास ५०% मिळण्याचा हक्क असेल. कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून पेन्शन. कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू आहे.

18 ते 40 वयोगटातील अर्जदारांना 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा 55 ते 200 रुपयांपर्यंतचे मासिक योगदान द्यावे लागेल.
अर्जदाराचे वय ६० झाल्यावर, तो पेन्शनच्या रकमेवर दावा करू शकतो. प्रत्येक महिन्याला एक निश्चित पेन्शन रक्कम संबंधित व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते.

५ ) मतदान कार्ड

मतदान कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र,याला EPIC म्हणूनही ओळखले जाते . ज्यांचे वय वर्ष १ ८ पूर्ण होते त्यांना हे कार्ड बनवता येते आणि याचाच वापर करून आपण मतदान करू शकतो . मतदान कार्डचा उपयोग आपण अनेक सरकारी कामासाठी दस्तऐवज पुराव्यासाठी करु शकता . हे कार्ड कसे बनवायचे यासाठी कोणती कागपत्रे लागतात याबद्दल अधिकची माहिती घेऊ शकता. VOTER ID CARD

६) आधार कार्ड

UIDI भारतातील रहिवाश्याची योग्य प्रकारे पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ २ अंकी क्रमांक देते त्याला आधार क्रमांक म्हणतात . एका व्यक्तीला आधारासाठी केवळ एकदाच नावनोंदणी करावी लागते . आधार ही प्रत्येक व्यक्तीची आयुष्यभराची ओळख आहे .आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र आहे आणि ते नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही .

आधार कार्डचे अनेक फायदे आहेत . आधार कार्ड आपल्याकडे नसल्यास आपल्याला कोणत्याही योजनेत सहभागी होता येत नाही. तसेच बँक मध्ये खाते आणि पॅनकार्ड ला लिंक करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे .

७ ) पॅनकार्ड

पॅनकार्ड म्हणजे भारतीय करदात्यांना जारी केलेले एक फिजिकल कार्ड आहे. पॅनकार्ड हे ओळखपत्र दस्तऐवज म्हणून काम करते. पॅनकार्ड हे भारतीय आयकर विभागाने जरी केलेले एक आवश्यक अधिकृत दस्तऐवज आहे .

बँक खाती उघडणे, जमीन खरेदी विक्री करणे, कर्जासाठी अर्ज करणे अश्याप्रकारचे व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असते . पॅनकार्ड वर आपले नाव तसेच आपली जन्मतारीख आणि १ ० अंकी क्रमांक असतो यामध्ये अक्षरे व अंक असतात .

८ ) रेशन कार्ड

रेशनकार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र असून आपण याचा वापर रहिवास पुरावा म्हणून करत असतो . रेशकार्डला शिधापत्रिका असे सुद्धा म्हटले जाते . राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबाना रेशन कार्ड जारी केले जाते . रेशन कार्डचे अनेक प्रकार आहे .

आपल्याला बँकेत खाते खोलण्यासाठी नवीन lpg गॅस कनेक्शन घेण्यासाठी, शासकीय योजनेचा लाभ रेशन कार्डचा उपयोग केला जातो . आपल्याला आपले रेशनकार्ड ऑनलाईन डाउनलोड सुद्धा करता येते .

९ ) किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी अल्प मुदतीचे कर्ज घेण्यासाठी भारत सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेली योजना आहे . ज्या शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याला विविध बँका मार्फत अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते . पी किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान कार्ड दिले जात आहे .

१ ० ) जॉब कार्ड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत बनवले जाणारे कार्ड म्हणजे जॉब कार्ड. जे ग्रामीण भागातील कुटुंबाना आर्थिक रोजगार मिळवून देणार कार्ड आहे. या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो . यामध्ये १ ० ० दिवसाची रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे .

जॉब कार्ड कसे मिळवावे व जॉबकार्डचे अधिकार कोणकोणते आहेत याची माहिती येथे क्लीक करून मिळवा

shivsurya: