घरकुल नोंदणी अर्ज कसा लिहावा? नोंदणी प्रक्रिया व PDF नमुना

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत शासनाकडून अनेक पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना आपल्या नवीन घराची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून घेण्याची आवश्यकता असते.

मात्र, नवीन घराची ग्रामपंचायतीमध्ये नोंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा? अर्ज कोणाच्या नावे द्यावा? अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत? तसेच घराची नोंद स्वतःच्या नावाने किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने करण्यासाठी अर्ज कसा करावा?

जर तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल नोंदणी अर्ज कसा लिहावा, अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तसेचआपल्याला  शेवटी तयार घरकुल नोंदणी अर्जाची PDF देखील उपलब्ध करून दिली आहे.

1. घरकुल नोंदणी अर्ज म्हणजे काय?

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थ्याने नवीन घराचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्या घराची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे लेखी विनंती अर्ज सादर केला जातो. त्याला घरकुल नोंदणी अर्ज म्हणतात.

या अर्जामध्ये लाभार्थ्याचे नाव, घर बांधलेल्या जागेचा मिळकत क्रमंक  किंवा गट नंबर, घराची लांबी-रुंदी, घराच्या बांधकामाचा प्रकार आणि घराची नोंद कोणाच्या नावाने करायची आहे, याची माहिती दिली जाते.

या अर्जाद्वारे लाभार्थी आपल्या नवीन घराची नोंद स्वतःच्या नावाने किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने ग्रामपंचायतला विनंती अर्ज करू शकतो.

2. घरकुल नोंदणी अर्ज कोणाला व कुठे द्यावा?

घरकुल नोंदणीसाठी अर्ज संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्या नावे लिहावा.

अर्जामध्ये खालील माहिती नमूद करावी.

  • ग्रामपंचायतीचे नाव.
  • तालुका आणि जिल्हा.
  • अर्जदाराचे संपूर्ण नाव.
  • अर्जदाराचा पत्ता.
  • मोबाईल क्रमांक.
  • घर बांधलेल्या जागेचा सर्व्हे नंबर / गट नंबर / मिळकत नंबर.

3. घरकुल नोंदणी अर्ज कसा लिहावा?

घरकुल नोंदणी अर्ज लिहिताना सर्वप्रथम प्रति, विषय आणि अर्जाचा मुख्य मजकूर लिहावा.

अर्जामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख करावा. त्यानंतर घराची लांबी, रुंदी, बांधकामाचा प्रकार आणि मिळकतीची माहिती नमूद करावी.

खाली घरकुल नोंदणी अर्जाचा नमुना दिला आहे.

4. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल नोंदणी अर्जाचा नमुना

5. घरकुल नोंदणी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत?

1. घरठाण उतारा / जागेचा ७/१२ उतारा

ग्रामपंचायतीला मिळकत नोंद असेल तर घरठाण उतारा आणि 7/12 मध्ये बांधकाम केला असेल तर जागेच्या उतारा जोडावा.

2. संमतीपत्र

आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तींचे संमतीपत्र जोडावे.

3. घर पूर्ण झाल्याचे फोटो व शौचालय फोटो 

नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे व शौचालय फोटो अर्जासोबत जोडावेत.

टीप : प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीकडून आवश्यक कागदपत्रांची खात्री करून घ्यावी.

6. घराची नोंद स्वतःच्या नावाने की पती-पत्नीच्या संयुक्त नावाने करता येते?

घरकुल नोंदणी अर्जामध्ये नवीन घराची नोंद पती-पत्नीच्या संयुक्त नावाने करण्याची विनंती करण्यासाठी पर्याय दिलेला आहे.

अर्ज सादर करताना आपल्याला अपेक्षित असलेली नोंद स्पष्टपणे नमूद करावी. प्रत्यक्ष नोंदणी संबंधित नियम, मालकी हक्काची कागदपत्रे आणि ग्रामपंचायतीच्या पडताळणीच्या अधीन राहील.

7. घरकुल नोंदणी अर्ज कुठे व कसा सादर करावा?

अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा.

अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोहोच किंवा आवक क्रमांक घ्यावा. पुढील कार्यवाहीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.

8. घरकुल नोंदणी अर्ज PDF डाउनलोड करा

तुम्हाला वरील अर्ज स्वतः लिहिण्यासाठी वेळ लागत असेल किंवा तयार अर्जाचा नमुना हवा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण घरकुल नोंदणी अर्जाची PDF तयार केली आहे.

या PDF मध्ये घराची माहिती, बांधकामाचे वर्णन, अर्जदाराची माहिती आणि घराची नोंद करण्याबाबत विनंती करण्यासाठी तयार नमुना दिलेला आहे.

तुमचा वेळ वाचवा आणि तयार अर्जाचा नमुना मिळवा!

9. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न १: घरकुल नोंदणी अर्ज कशासाठी वापरला जातो?

उत्तर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बांधकाम पूर्ण झालेल्या नवीन घराची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्याची विनंती करण्यासाठी हा अर्ज वापरता येतो.

प्रश्न २: घरकुल नोंदणी अर्ज कोणाच्या नावे द्यावा?

उत्तर : संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांना उद्देशून अर्ज द्यावा.

प्रश्न ३: घरकुल नोंदणी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत?

उत्तर : या अर्जाच्या नमुन्यानुसार घरठाण उतारा / जागेचा ७/१२ उतारा, संमतीपत्र आणि घर पूर्ण झाल्याचे फोटो जोडावेत.

प्रश्न ४: घराची नोंद पती-पत्नीच्या संयुक्त नावाने करता येते का?

उत्तर : अर्जामध्ये पती-पत्नीच्या संयुक्त नावाने नोंद करण्याची विनंती करण्याची तरतूद आहे. अंतिम नोंदणी संबंधित नियम व पडताळणीवर अवलंबून असते.

प्रश्न ५: घरकुल नोंदणी अर्ज PDF कुठे मिळेल?

उत्तर : या लेखामध्ये दिलेल्या खरेदी लिंकवरून तयार घरकुल नोंदणी अर्ज PDF मिळवता येईल.

निष्कर्ष

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवीन घराची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी योग्य अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे.

त्यासाठी घरकुल नोंदणी अर्जाचा तयार नमुना तुमचा वेळ वाचवू शकतो.

अशाच प्रकारचे ग्रामपंचायत अर्ज, दाखले, नमुने, नोंदवह्या आणि महत्त्वाचे दस्तऐवज मिळवण्यासाठी mygrampanchayat.com या वेबसाइटला नियमित भेट द्या.

ग्रामपंचायतविषयक उपयुक्त माहिती आणि तयार PDF नमुन्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा!

sagar suryawanshi: