आपल्याला अपत्य घोषणापत्र हे शासकीय कामासाठी, निवडणुकीसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असते. ते कोठे मिळते त्याचबरोबर त्याचा वापर कुठे केला जातो या सर्वांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
अपत्य प्रमाणपत्र म्हणजे आपल्याला किती अपत्य ( मुले) आहेत हे दर्शविणारे प्रमाणपत्र त्याला अपत्य प्रमाणपत्र म्हणू शकता. अपत्य प्रमाणपत्रात आपण आपली किती मुले आहेत याचा उल्लेख करतो. हे प्रमाणपत्र आपल्याला कोठे मिळू शकते पहा.
अपत्याचे स्वयंघोषणपत्र आपल्याला खास करून निवडणुकीसाठी आवश्यक असते. आपल्याला तिसरे अपत्य असेल तर आपल्याला निवडणुकीसाठी अर्ज करता येत नाही. (अटी )
आपल्याला निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी आपण आज रोजी असलेल्या अपत्यांची संख्या किती ते नमूद करावी. त्यापैकी दिनांक १३ सप्टेंबर २००० नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या किती हे नमूद करावी. ( त्यांच्या जन्म तारखा त्यामध्ये उल्लेख कराव्यात )
दिनांक १२ सप्टेंबर २००१ नंतर एकूण मुलांच्या संख्येत भर पडून ती दोनपेक्षा जास्त झाल्यास उपरोक्त योजनेतील लाभास अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे. असे प्रमाणपत्रात नमूद करायला हवे.
अश्याप्रकारे आपल्याला अपत्य प्रमाणपत्रात आपली किती मुले हे स्वतः लिहून घोषणापत्र करायचे असते त्याला अपत्य स्वयंघोषणपत्र म्हणतो.
अपत्य स्वयंघोषणपत्राचा नमुना
आपल्याला अपत्य घोषणापत्र लिहताना सर्वात प्रथम आपले स्वतःचे नाव लिहा.
त्यानंतर आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहायचे आहे.
आपले वय किती, आपला संपूर्ण पत्ता नमूद करा त्यानंतर आपल्याला प्रमाणपत्रात वरील अटी लिहायच्या आहेत.
आणि दिनांक आणि स्थळ टाकून आपली स्वतःची स्वाक्षरी करून हे प्रमाणपत्र आपल्याला ज्या कामासाठी उपयुक्त आहे तेथे वापरायचे आहे.
अपत्य प्रमाणपत्र नमुना डाउनलोड
आपल्याला अपत्य प्रमाणपत्र नमुना डाउनलोड कसा करता येणार आहे पहा. आपण हे प्रमाणपत्र स्वतः लिहून देऊ शकता
किंवा खालिलप्रमाणे नमुना आहे तो डाउनलोड करून वापरू शकता.
Download सूचना
अपत्याबाबत स्वयंघोषणापत्र नमूना download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
तहसिलदार रहिवाशी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
वरीलप्रमाणे आपल्याला अपत्य स्वघोषणापत्र बद्दल माहिती मिळालेली आहे. तहसीलदार रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट लिंक ला क्लिक करून मिळावा.