June 20, 2024

गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे अर्ज नमुना DOWNLOAD २०२१

गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे :- जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चार आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरूपेक्षा जात गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  • २ गुरे ते ६ गुरे यासाठी अनुदान :- ७७१८८/-
  • ६ ते १२ गुरे यासाठी अनुदान :- १५४३७६/-
  • १८ पेक्षा जास्त तिप्पट :- २३१५६४

आपल्याला वरीलप्रमाणे २ गुरे पासून १८ पेक्षा जास्त गुरे असतील तर आपणास गोठा बांधण्यास अनुदान मिळते.

शासन निर्णय : – त्या अनुषंगाने , ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या या प्रत्येक पात्र लाभाथ्यायाला शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत  खालील नमूद केलेल्या ४ वैयक्तिक  कामाांना सर्वोत्तम प्राधान्यक्रमाने सर्व  ग्रामपांचायत क्षेत्रात राबववण्यात यावे.

व दिनांक ९  ऑक्टोबर २०१२ शा .नि मधील एका गावात जास्तीत जास्त ५ गोठयाांची मर्यादा मयादा या शासन निर्ण्यान्वये वगळण्यात येत आहे.

Download here 👇

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

हा अर्ज Download करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कुठे करावा ?

आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये याचा अर्ज करावा लागतो. यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव त्याचप्रमाणे खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

१) ग्रामसभा ठराव
२) नमुना नं ८ किवा ७/१२ उतारा

( ऑनलाईन सातबारा काढण्यासाठी येथे क्लीक करा) https://youtu.be/byt5BJuzMCQ
३) अंदाजपत्रक ( ग्रामपंचायत )
४) अ .ज ./ अ . जा./भूमिहीन/अपभूधारक शेतकरी/ अपंग दाखला
५) जनावरांचा गोठा / जनावरांचा तपशील ( संख्या )
६) यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
७) प्रस्तावित जागेचा gps phhoto ( note cam )
८) उपलब्ध पशुधन यांचे gps मध्ये tagging फोटो
९) जॉब कार्ड झेराक्स

(महात्मा गांधी रोजगार हमी योजना जॉब काढण्यासाठी येथे क्लिक करा )


१०) बँक पास बुक झेरॉक्स
११) आधार कार्ड
१२) ग्रामपंचायत मागणी पत्र

अधिक माहितीसाठी खालील लिंक ला follow करा

19 thoughts on “गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे अर्ज नमुना DOWNLOAD २०२१

  1. तुम्ही हा फॉर्म downlod करा आणि ग्रामपंचायत मध्ये जमा करा.

    1. ग्रामपंचायत मध्ये अर्ज भरून कागदपत्रे सह पंचायत समिती मध्ये जमा करावा

    1. अर्ज downlod करा आणि तुमच्या ग्रामपंचायत मध्ये भेट द्या

Comments are closed.