महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील तुमचे अधिकार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील तुमचे अधिकार  कामाची मागणी

१. कामाची मागणी केव्हाही करता येऊ शकते. जॉबकार्डवरील क्रमांक नमूद केल्यास उत्तम मागणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात नोंदविता येते.

२. काम मागणीनंतर १५ दिवसात काम सुरु झाले पाहिजे.

३. काम मागणी अर्जानंतर तुम्हाला तारीख व शिक्क्यासह पोचपावती मिळाली पाहिजे.

४. जर १५ दिवसात काम मिळाले नाही तर बेरोजगार भत्ता मिळण्याचा हक्क आहे.

मजुरांचे अधिकार

१. सर्व मजुरांना मान्य नियमानुसार मजुरीचा दर लागू आहे.

२. स्त्री मजूर व पुरुष मजूर यांना समान वेतन लागू आहे.

३. मजुरी दर आठवड्याला किंवा जास्तीत जास्त १५ दिवसांनी मिळणे बंधनकारक आहे.

४. मजुरी ही आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

५. घरापासून कामाचे ठिकाण ५ किलोमीटरपेक्षा जास्त दूर असेल तर मजुराला प्रवास भत्ता देण्याची

तरतूद आहे. हा प्रवासभत्ता मजुरीच्या दराच्या १० टक्के आहे.

कामाच्या ठिकाणी

१. हजेरीपत्रक कामाच्या ठिकाणी उपलब्ध असायला हवे. मजुराला कामाच्या ठिकाणी हजेरीपत्रक तपासण्याची मुभा आहे.

२. कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी सावली, पिण्याच्या पाण्याची सोय व प्रथमोपचार पेटी देणे आवश्यक आहे.

३. ६ वर्षाखालील ५ पेक्षा जास्त मुले असल्यास पाळणाघराची सोय होणे आवश्यक आहे..

बेरोजगार भत्ता

१. कामाच्या मागणीनंतर १५ दिवसात काम सुरु झाले नाही तर तुम्हाला बेरोजगार भत्ता मिळायला पाहिजे.

२. सुरुवातीला ३० दिवस मजुरीच्या दराच्या २५ टक्के व त्यानंतर मजुरीच्या दराच्या ५० टक्के असा बेरोजगार भत्ता मिळायला पाहिजे.

३. बेरोजगार भत्त्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत अर्ज करावा. अर्ज करताना मागणी अर्जाची

पोचपावती आवश्यक आहे.

जॉब कार्ड

१. तुम्हाला जॉब कार्ड फोटोसहित मोफत मिळायला हवे.

२. प्रत्येक मजूर कुटूंबाला स्वतंत्र जॉबकार्ड मिळाले पाहिजे.

३. जॉबकार्ड कुटुंबाने स्वतःजवळ बाळगले पाहिजे. जॉबकार्ड अन्यकुणाकडेही देऊ नये.

४. जॉबकार्डवरील नोंदी तुमच्या समक्ष केल्या पाहिजेत.

५. जॉबकार्डवर काही चुकीच्या नोंदी होत नाहीत ना याची खातरजमा करुन घ्यावी.

६. जॉबकार्ड हरवल्यास नवीन जॉबकार्डसाठी ग्रामपंचायतीत अर्ज करावा.

मदत आणि तक्रार

१. काही अडचण असल्यास ग्रामपंचायतीत संपर्क करावा. तिथे मदत न मिळाल्यास आपली तक्रार पंचायत

समितीतील कार्यक्रम अधिकाऱ्याकडे नोंदवावी.

२. कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यास त्यांनी ७ दिवसात त्यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. ३. त्याशिवाय www.nrega.nic.in या वेबसाईटवरही तुमची तक्रार नोंदवू शकता. किंवा 1800223839

टोल फ्री क्रमांकावर फोन करु शकता.

shivsurya: