एक गुंठा,एक एकर,हेक्टर म्हणजे नेमके किती ?

एक गुंठा, एक एकर,हेक्टर म्हणजे नेमके किती ? शेतीची मोजमापे जाणून घेऊया.

आपल्याला बऱ्याचदा १ गुंठा म्हणजे किती हे माहित नसते त्याचप्रमाणे १ एकर, १ हेक्टर तसेच चौ. फूट आपल्याला समजत नसते.
अनेकदा आपण जमीन खरेदी- विक्री व्यवहार करत असतो पण आपल्याला जमिनीचे मोजमापे माहित नसते. आपल्याला कडे जमीन आहे हे कळण्यासाठी आपली जमीन गुंठा, एकर, हेक्टर मध्ये असते तसचे चौ. फूट मध्ये सुद्धा मोजमाप असते. ग्रामपंचायत ला आपले मोजमाप चौ फुटामध्ये असते. तर हे आपण कसे मोजवे आपण फार गोंधळून जातो पण आपल्याला खालीलप्रमाणे सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे.

  • १ आर = १ गुंठा

  • १ गुंठा = [ ३३ फुट x ३३ फुट ] = १०८ ९ चौ फुट

  • १ एकर = ४० गुंठे x [ ३३ x ३३ ] = ४३५६० चौ फुट

  • १ हेक्टर = १०० आर म्हणजेच १०० गुंठे

  • १ हेक्टर = २.४७ एकर = २.४७ x ४० = ९ ८.८ गुंठे

  • १ चौ . मी . = १०.७६ चौ फुट

याची अधिक माहिती घ्या.

१ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८ ९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट

३३ X ३३ = १०८९

एक गुंठा ३३ फूट x ३३ फूट = १०८९ स्क्वेअर फुटाचा असतो

१ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

१ चौ.मैल = ६४० एकर

१ चौ.किमी = २४७ एकर

अश्याप्रकारे आपण आपल्या जमिंचे गुंठे किती, एकर किती हेक्टर किती आणि चौरस फुट किती हे काढावे.

अधिक माहितीसाठी खालील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा

shivsurya: