१० शेळ्या १ बोकड गट वाटप योजना २०२२ | 10 sheli 1 bokad yojna maharashtra 2023

आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो की, शेली पालन योजना महाराष्ट्र मध्ये राबवली जाते पण याबद्दल आपल्याला काही माहिती असते का. तर पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र शासन यामार्फत १० शेळ्या, मेंढ्या व १ बोकड,मेंढा वाटप योजना राबवली जाते. हि योजना राज्यायस्तरीय व जिल्हास्तरीय अशी राबवली जाते व याचे online फॉर्म भरले जातात. योजनेची आपण सविस्तर माहिती घेऊया या योजनेमध्ये आपल्याला किती खर्च येतो, शासन किती अनुदान देते, शर्ती, पात्रता व कागदपत्र कोणकोणती आहेत हे पहा.

या योजनेमधील अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य धरली जाईल.

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. ग्रामीण भागातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

योजनांचा तपशील

राज्यस्तरीय योजना शेळी / मैढ़ी गट वाटप करणे

योजनेचे नाव अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

टीप :

  1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही.
  2. योजने अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील. 3. योजने अंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाच्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

• लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम (उतरत्या क्रमाने)

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील.

अ.क्र.तपशील दर (रक्कम रुपयात ) १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
शेळ्या खरेदी ८०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम८०,०००/- (१० शेळ्या )
६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) ६०,०००/- (१० शेळ्या)
बोकड खरेदी १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर )१०,०००/- (१ बोकड )
८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर) ८,०००/- (१ बोकड)
शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी)१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )   रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी)
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य, चारयावारिल खर्च) लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च १,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी   ७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी)

एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील.

अ.क्र.तपशील दर (रक्कम रुपयात ) १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
मेंढया खरेदी १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )   ८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) १,००,०००/- (१० मेंढया) ८०,०००/- (१० मेंढया)
नरमेंढा खरेदी १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ) १०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर १२,०००/- (१ नरमेंढा ) १०,०००/- (१ नरमेंढा )
मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) १२.७५% (अधिक १८% वस्तू व सेवाकर) रु१६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी) रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी)
शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य, चारयावारिल खर्च) लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी) १,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी)

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे .

अ.क्र.गट   प्रवर्ग एकूण किंमत शासनाचे अनुदान लाभार्थ्याचा स्वहिस्सा
शेळी गट- उस्मानाबादी /संगमनेरी सर्वसाधारण   अनु. जाती व जमाती १,०३,५४५/-   १,०३,५४५/- ५१,७७३/-   ७७,६५९/- ५१,७७२/-   २५,८८६/-
शेळी गट- अन्य स्थानिक जाती सर्वसाधारण   अनु. जाती व जमाती ७८,२३१/-   ७८,२३१/- ३९,११६/-   ५८,६७३/- ३९,११५/-   १९,५५८/-
मेंढी गट- माडग्याळ सर्वसाधारण   अनु. जाती व जमाती १,२८,८५०/-   १,२८,८५०/- ६४,४२५/-   ९६,६३८/- ६४,४२५/-   ३२,२१२/-
दख्खनी व अन्य स्थानिक जाती सर्वसाधारण   अनु. जाती व जमाती १,०३,५४५/-   १,०३,५४५/- ५१,७७३/-   ७७,६५९/- ५१,७७२/- २५,८८६/-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )

२) * सातबारा (अनिवार्य)

३) * ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) * आधारकार्ड (अनिवार्य)

६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)

७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)

८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (अनिवार्य )

९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

अधिक माहितीसाठी शासन निर्णय वाचा :- पहा

shivsurya: