महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून महाराष्ट्रात शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवार दिनांक : ०९/१२/२०२० झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हि योजना शरद पवार यांची वयाची ऐंशी वर्षे पूर्ण म्हणजे १२ डिसेंबर पासून सुरु करणार येत आहे.
मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येणार आहे. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतून प्रत्येक लाभार्थीला गाय म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे , कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामाची लाभ मिळवून देण्यात येईल.
अर्ज downlaod :-
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे :-
जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चार आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरूपेक्षा जात गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.
शेळीपालन शेड बांधणे :-
शेळ्यामेंढ्याकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रीय खत म्हणून वापरले जाऊ शकेल शेळी हि गरीबाची गे समजली जाते. शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून १० शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही. १० शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेत मजुराला त्याचा फायदा होत नाही. हि बाब लक्षात घेता किमान २ शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल . एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटूंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पॅट अनुदान मजूर करण्यात येईल.
कुक्कुटपालन शेड बांधणे :-
कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागात कुटूंबाना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक्य पोषक अशा प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो. मात्र निवारा चांगला नसल्याने कोंबड्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे, पिल्लांचे आणि अंड्याचे प्राण्यापासून संरक्षण होते प्रत्येक शेडला ४९,७६०/- रुपये खर्च अपेक्षित आहे. १०० पक्षी यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५०च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग :- शेतातील कचऱ्यावर कामोस्टिंगद्वारे प्रकिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रिय पदार्थात सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. यांकरिता शेतात एक रचले जातात. २ ते ३ महिन्यात काळपट तपकिरी भुसभूशीत, महु , दुर्गन्धी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
अर्ज नमुना व अर्ज कुठे करावा ?
तुम्हाला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा अर्ज खालीलप्रमाणे मिळेल तो अर्ज बरोबर माहिती भरून खालील सर्व कागदपत्रे जोडून प्रस्ताव ग्रामपंचायत मध्ये जमा करणेत यावे.
लाभार्थीची पात्रता व कागदपत्रे :-
१ ) सदर लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील असणे आवश्यक आहे .
१ ) अनुसूचित जाती, २ ) अनुसूचित जमाती, ३ ) भटक्य जमाती ( NT ), ४ ) भटक्या विमुक्त जमाती ( DT ), ५ ) दारिदय रेषेखालील इतर कुटुंब , ६ ) महिलाप्रधान कुटुंब, ७ ) शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, ८ ) भूसुधार योजनेचे लाभार्थी, ९ ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, १० ) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्ती ११ ) कृषी कर्जमाफी २००८ नुसार अल्प भुधारक ( १ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर ( पएकर ) पर्यत जमीन असलेला शेतकरी ( जमीन मालक / कुळ ) व सीमांत शेतकरी ( १ हेक्टर पर्यत जमीन असलेला शेतकरी ),
( ज्या प्रवर्गात निवड केली आहे त्या प्रवर्गाचे संबधित कागदपत्रे सोबत जोडावीत . )
2) मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विवीध वैयक्तिक ( उदा . कामाचा प्रकार फळबाग , वृक्षलागवड , शेततळे ) व सार्वजनिक ( उदा.कामाचा प्रकार – रस्ता , ओढा / नाला / पाझर तलाव गाळ काढणे / ग्रा.प क्षेत्रावर वृक्ष लागवड संगोपन इ . ) कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण ६०:४० लाभार्थी पातळीवर राखण्यासाठी योजने अंतर्गत काम केलेले असावे . ( याबाबत ग्रामसेवक / कृषी सहाय्यक / यंत्रणा अधिकारी यांचा कामाबाबतचा शिफारस दाखला जोडावा . )
३ ) सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान २० ते ५० फळझाडे / वृक्षलागवड करण्यात येऊन त्याचे तीन वर्ष संगोपन करून झाडे १०० % जिवंत ठेऊन योजनेचा लाभ पुर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्ष मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान १०० दिवस काम पुर्ण करणे आवश्यक आहे .
१ ) वैयक्तिक क्षेत्रावर २० ते ५० फळझाडे / वृक्षलागवड केल्यास :- गाय गोठा ( छता विरहित ) कामाचा लाभाकरिता पात्र असेल I
२ ) वैयक्तिक क्षेत्रावर ५० पेक्षा जास्त फळझाडे / वृक्षलागवड केल्यास :- गाय गोठा ( छतासह ) / शेळी पालन शेड / कुक्कूटपालन कामाचा लाभाकरिता पात्र असेल
३ ) सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान १०० दिवस काम केल्यास :- छतासह गोठा / शेळी पालन शेड / कुक्कुटपालन कामाचा लाभाकरिता पात्र असेल
४ ) पशुपालन असलेबाबतचा पशुधन पर्यवेक्षक / पशुधन अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे .
१ ) गाय गोठा करीता- २ ते ६ गुरे आवश्यक आहेत . ( जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील ) ,
२ ) शेळी पालन शेड करीता २ ते १० शेळी आवश्यक आहे .
३ ) कुकुट पालन शेड करीता किमान १०० पक्षी आवश्यक आहे . ( ज्या लाभार्थीकडे १०० पक्षी नाही त्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जमिनदारांसह शेडची मागणी करावी व शेडचे काम पुर्ण झाल्यानंतर १ महिन्याच्या कालावधीत कुकुटपालन शेड मध्ये १०० पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील .
५ ) कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र online जॉबकार्ड किवा जॉबकार्ड झेरॉक्स प्रत आवश्यक आहे .
६ ) लाभार्थीच्या नावे जमीन / जागा असणे आवश्यक आहे . ( असल्यास सोबत ७/१२ , ८ अ व ग्रामपंचायत नमुना ९ चा उत्तारा ( तीन महिने आतील ) साक्षांकित सत्य प्रत जोडावा )
७ ) लाभार्थी सदर गावाचा रहिवाशी असणे आवश्यक आहे . ( रहिवासी स्वयंघोषणापत्र ) .
८ ) लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स प्रत
९ ) लाभार्थी चे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक झेरॉक्स प्रत
१० ) सदरचे काम ग्रामपंचायत चालू वार्षिक कृती आराखडा / लेबर बजेट / पुरवणी लेबर बजेट मध्ये नाव समाविष्ट असलेबाबत ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र . नुसार शिफारस पत्र घेणे आवश्यक आहे .
११ ) निवडलेल्या कामाचा / जागेचा अक्षांश – रेखांश असलेला फोटो सह ग्रामसेवक , तांत्रिक सहाय्यक ( नरेगा ) / पशुधन पर्यवेक्षक , लाभार्थी यांची संयुक्त सहीचा स्थळ पहाणी अहवाल जोडणे आवश्यक आहे .
अर्जा सोबत वरीलप्रमाणे १ ते ११ चे संबधीत सर्व कागदपत्र जोडावीत .
सदर लाभार्थीचे काम मंजुर झाल्यास योजनेंतर्गत केलेल्या कामाचे फोटो १ ) काम सुरु करण्यापुर्वीचा फोटो , २ ) काम चालू असतानाचा फोटो , ३ काम पूर्ण झालेल्याचा बोर्ड व लाभार्थी सह फोटो इत्यादी हे तीन प्रकारामधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत ७ दिवसात सादर करणे बंधनकारक राहील .
अर्ज downlaod :-
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
वरील कागदपत्रे जोडून आपण हा अर्ज बरोबर भरून आपण ग्रामपंचायत मध्ये जमा करायचा आहे.
खालील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा अधिक माहिती साठी .
या योजनेचा लाभ कसा मिळवायचा ? योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती? योजनेसाठी पात्रटा? आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. ज्यांनी खालील Video पहिला नाही त्यांनी प्रथम पाहून घ्या .
View Comments (0)