Police Patil Salary १५ हजार पण कधीपासून मिळणार ?

Police Patil Salary : आपल्याला माहित असेल पोलीस पाटील कोण आहेत? आणि कोणते काम करतात? या पोलीस पाटील यांच्या कर्तव्यात वाढ झाल्याने तसेच जबाबदारी वाढल्याने त्यांच्या संघटनेने वेळोवेळी पगार वाढ होणेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनचा गाव पातळीवर महत्वाचा दुवा आहे. पोलीस पाटील यांची कामे कोणती, जबाबदाऱ्या कोणत्या याबाबत खालीलप्रमाणे माहिती देण्यात आली आहे.

अखेर पोलीस पाटील याना Police Patil Salary मानधनात वाढ करण्यात आली आहे. सध्या पोलीस पाटील याना मानधन हे ६ हजार ५०० रुपये देण्यात येते. पण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने १३ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळ निर्णयात पोलीस पाटील यांच्या मानधनात भरघोस वाढ केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ निर्णयात महत्वाचा निणर्य घेण्यात आला. यामध्ये पोलीस पाटील मानधन हि महत्वाची बाब होती. १३ मार्चच्या मंत्रिमंडळात पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली.आता पोलीस पाटलांना मिळणार १५ हजार रुपये मासिक मानधन.

पोलीस पाटीलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निणर्य . आता १ एप्रिल २०२४ पासून पोलीस पाटलांना मिळणार १५ हजार मासिक मानधन.

पोलीस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे . मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या ३९४ कोटी ९४ लाख रुपये वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली याचा शासन निर्णय आज दि. १५ मार्च २०२४ काढण्यात आला.

१५ हजार मानधन ह्या तारखेपासून

राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत… १५ मार्च रोजी गृहविभाग यांच्या मार्फत शासन निर्णय काढण्यात आला यानुसार मासिक १५ हजार रुपये मानधन हे १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.

पोलीस पाटील यांची कर्तव्ये, कामे आणि सम्पूर्ण जबाबदारी कोणत्या येथे क्लीक करा

पोलीस पाटील यांची कर्तव्ये जबाबदाऱ्या आणि वाढती महागाई तसेच महसूल विभागाकडील कोतवालाच्या मानधन वाढीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्यात आली. पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ झाल्याने पोलीस पाटील खूप खुश झालेले आहेत. यामुळे बाकीच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचा सरकाने विचार मात्र केला नाही.

पोलीस पाटील संपूर्ण माहिती । पोलीस पाटील कर्तव्य । पोलीस पाटील पात्रता । पोलीस पाटील निकष । पोलीस पाटील म्हणजे काय याबद्दल माहिती हवी असेल तर वरील लिंक ला क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवू शकता.

shivsurya: