पोलीस पाटील संपूर्ण माहिती । पोलीस पाटील कर्तव्य । पोलीस पाटील पात्रता । पोलीस पाटील निकष । पोलीस पाटील म्हणजे काय
तुम्हाला आम्हाला सर्वाना माहित आहे पोलीस पाटील म्हणजे कोण . पोलीस पाटील हा आपल्या गावातील शासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील दुवा आहे. पूर्वी महाराष्ट्रातील गावपातळीवर प्रमुख व्यक्ती म्हणून “पाटील” हे पद होते. पूर्वी कायदा व सुव्यस्था व सामजिक समस्या सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका पोलीस पाटील बजावत होते.
पोलीस पाटलांची नेमणूक, त्यांचे पारिश्रमिक व सेवेच्या इतर शर्ती.
(१) राज्य शासन गावासाठी किंवा गावाच्या गटासाठी एक किंवा अधिक पोलीस पाटलांची नेमणूक करील.
(२) प्रत्येक गावातील ग्राम पोलीस, पोलीस पाटलाच्या प्रभाराखाली असतील आणि एकापेक्षा अधिक पोलीस पाटील असतील त्याबाबतीत, राज्य शासन निर्देश देईल अशा पोलीस पाटलाच्या प्रभाराखाली असतील.
(३) पोलीस पाटलांची नेमणूक, त्यांचे पारिश्रमिक व सेवेच्या इतर शर्ती ह्या राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी ठरवील त्याप्रमाणे असतील.
(४) पोट-कलमे (१) व (२) खालील राज्य शासनाच्या अधिकाराच वापर जिल्हा दंडाधिका-याला सुद्धा करता येईल :
(५) परंतु, कोणत्याही गावाकरिता किंवा गावांच्या गटाकरिता, राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या पोलीस पाटलांची संख्या, राज्य शासनाच्या पूर्वमंजुरीशिवाय, वाढविता येणार नाही.
पोलीस पाटलाची कर्तव्ये.
जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आदेशांस अधीन राहून पोलीस पाटील.
(1) पोलीस पाटील यांचे गाव ज्याच्या स्थानिक अधिकारितेत येत असेल अशा इतर कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशान्वये ते काम करतील.
(2) असा कार्यकारी दंडाधिकारी जी कोणतीही विवरणे आणि माहिती मागवील, ती विवरणे व माहिती पुरवील.
(3) आपल्या गावातील अपराधांचे प्रमाण व ग्राम पोलिसांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी याविषयी आणि गांवातील समाजाचे स्वास्थ्य व त्यांचे सर्वसाधारण परिस्थिती याविषयी अशा कार्यकारी डाघेकाऱ्यास नियमितपणे माहिती देईल.
(4) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या कामी मदत मागितली असता अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या अधिकारात असेल त्याप्रमाणे सर्व प्रकारची मदत देईल .
(5) दंडाधिकाऱ्याकडून किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून त्यास जे आदेश व अधिपत्रे देण्यात येतील त्या सर्व आदेशांचे व अधिपत्रांचे पालन व कार्यन्वयन तत्परतेने करील.
(6) सार्वजनिक शांततेस ज्या गोष्टीमुळे धोका पोहोचेल अशा गोष्टीविषयी गुप्तपणे माहिती गोळा करील व ती ठाणे अधिकाऱ्यास कळवील.
(7) आपल्या गावाच्या हद्दीत अपराध घडू नये म्हणून किंवा लोकांस उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करील व आपल्या गावाच्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध करून त्यांना न्यायासनासमोर हजर करील.
(8) या अधिनियमाच्या इतर तरतुदींन्वये विनिर्दिष्ट करण्यात येतील आणि राज्य शासनाकडून या बाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यात येतील, अशी इतर कर्तव्ये पार पाडील.
याव्यतिरिक्त आणखीन माहिती हवी असल्यास खालील बुक वाचू शकता.
हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
ग्रामसेवक वर्गावरील असलेले प्राधिकार.
पोलीस पाटलास, त्याच्याकडे सोपवून देण्यात आलेली कर्तव्ये पार पाडताना गावातील सेवकवर्गाने त्यास सहाय्य करावे असे फर्माविण्याचा प्राधिकार असेल-मग अशा सेवकवर्गामधील कर्मचारी सामान्यतः कोणत्याही पदाच्या नात्याने कामावर लावण्यात आलेले असोत आणि गावाच्या तलाठ्याने पोलीस पाटलासाठी सर्व लेखी विवरणे व कामकाजाचे कागदपत्र तयार करणे, हे त्याचे कर्तव्य असेल.
जबरी चोरी इत्यादी विरुद्ध सावध गिरीच्या उपाययोजना.
जबरी चोरी, शांततेचा भंग करणे आणि जनतेस व गावातील समाजास हांनी पोहोचविणारी कृत्ये करणे या गोष्टी घडू नयेत म्हणून, जेणे करून शक्य होईल तितक्या अधिक सुरक्षिततेसाठी बंदोबस्त करता येईल अशा रीतीने पोलीस पाटील गावातील सेवकवर्गातील कर्मचाऱ्यांना कामावर लावीन आणि उक्त कर्मचारीवर्गातील कोणत्याही व्यक्तीने गैरवर्तणूक किंवा हयगत केल्यास अशा सर्व बाबतीत, पोलीस पाटील, कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे त्याविषयी अहवाल पाठवील.
कर्तव्य, इत्यादीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शास्ती.
कोणत्याही पोलीस पाटलाने किंवा पोलिसाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी बोलविला जाण्यास कर्तव्य, पात्र असेल अशा गावातील सेवकवर्गातील कर्मचाऱ्याने आपली कर्तव्ये पार पाडण्यात दुर्लक्ष केले असेल इत्यादीकडे किंवा त्याबाबतीत त्याने हयगत केली असेल किंवा कोणत्याही गैरवर्तणुकीबद्दल तो दोषी असेल, तर, तो दुर्लक्ष पुढील शास्तींना पात्र ठरेल
(क) ठपका ठेवणे.
(ख) शासनाला पोहोचलेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीच्या संपूर्ण किंवा काही भागाची त्याच्या पारिश्रमिकातून वसुली करणे.
(ग) त्याच्या मासिक पारिश्रमिकापेक्षा अधिक नसेल इतका दंड करणे .
(घ) एक वर्षापेक्षा अधिक नसणाऱ्या मुदतीपर्यंत (त्यास) सेवेतून निलंबित करणे .
(ङ) नोकरीतून काढून टाकणे, पण त्यामुळे भविष्यकाळात शासनाच्या अधीन नोकरी करण्यास तो अपात्र ठरणार नाही.
(च) नोकरीतून बडतर्फ करणे, त्यामुळे भविष्यकाळात शासनाच्या अधीन नोकरी करण्यास तो सामान्यतः अपात्र ठरेल.
तालुका दंडाधिकाऱ्याच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्यास, खंड (क) ते (घ) मध्ये उल्लेखिलेल्या शास्तींपैकी कोणत्याही शास्ती लादता येतील आणि पोलीस पाटलाची नेमणूक करण्यास सक्षम असलेल्या उप-विभागीय दंडाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यास, खंड (ङ) व (च) मध्ये उल्लेखिलेल्या शास्ती लादता येतील.
हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
फौजदारी खटला चालविला जाण्याच्या पात्रतेस बाध न येणे.
कोणत्याही पोलीस पाटलावर किंवा गावातील सेवकवर्गातील कर्मचान्यांपैकी एखाद्या कर्मचान्यावर कोणताही अपराध केल्याचा आरोप ठेवण्यात आल्यास, त्या अपराधाबद्दल त्याच्यावर फौजदारी खटला चालविला जाण्यास, निकटपूर्वीच्या कलमातील कोणत्याही तरतुदीमुळे बाघ येणार नाही.
विभागीय चौकशी किंवा फौजदारी खटला चालू असेपर्यंत निलंबित करण्याचा अधिकार
पोलीस पाटलाची नेमणूक करण्यास सक्षम असलेला जिल्हा दंडाधिकारी किंवा उप-विभागीय दंडाधिकारी यास, जर पोलीस पाटील त्याच्या अधिकारितेच्या हद्दीत नोकरी करीत असेल तर त्यास, अशा पाटलाविरुद्धची विभागीय चौकशी किंवा चौकशी आणि फौजदारी खटल्याची न्याय चौकशी होईपर्यंत निलंबित करता येईल.
गावातील गुन्हेगार पळून गेला असल्यास किंवा त्याचा ठावठिकाणा माहिती नसल्यास ठाणे अधिकर्यास तसे कळविणे.
कोणत्याही गावाच्या हद्दीमध्ये गुन्हा करण्यात आला असेल व गुन्हा करणारी व्यक्ती पळून 1 गेली असेल किंवा तिचा ठावठिकाणा माहीत नसेल तर, पोलीस पाटील त्या विषयीची माहिती ठाणे अधिकान्यास त्वरेने पाठवील व त्या प्रकरणाच्या संबंधात मिळविता येण्याजोगा सर्व साक्षीपुरावा मिळवील. आणि तो स्वतः त्या प्रकरणात चौकशी करण्याच्या कामास सुरवात करील व अशा साक्षीपुराव्याबद्दल ठाणे अधिकाऱ्यास कळवीत राहील.
गावाच्या हद्दीत अनैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू घडल्यास किंवा प्रेत सापडल्यास त्याबाबतीत तपास करणे.
(1) कोणत्याही गावाच्या हद्दीत कोणताही अनैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू घडल्यास किंवा कोणतेही प्रेत आढळून आल्यास पोलीस पाटील ताबडतोब घटनास्थळी जाईल व त्या गावातील किंवा जवळपासच्या दोन किंवा अधिक सुजाण व्यक्तींना बोलावील व मग त्या व्यक्ती मृत्यूच्या कारणांची आणि त्या प्रकरणाच्या सर्व परिस्थितीची चौकशी करतील व एक लेखी अहवाल तयार करतील आणि पोलीस पाटील तो अहवाल ठाणे अधिकान्याकडे ताबडतोब पाठविण्याची व्यवस्था करील.
(२) असा तपास करण्यासाठी ज्या कोणत्याही व्यक्तीस पोलीस पाटलाने सांगितले असेल त्या व्यक्तीने, तशा प्रकारे वागण्यास समर्थनीय कारण नसताना नकार दिला किंवा तसे करण्यास हयगय केली तर, अपराधसिद्धीनंतर, त्यास पन्नास रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल.
(३) तपासाच्या निष्कर्षावरून मृत्यू अनैसर्गिकरीत्या घडला आहे असे सकारण वाटत असेल तर. पोलीस पाटील, ठाणे अधिकाऱ्यास त्याविषयी ताबडतोब सूचना देईल आणि जर असे प्रेत वाटेत कुजून जाण्याचा धोका टाळता येईल अशा रीतीने ते पाठविता येत असेल तर तो ते नजिकच्या जिल्हा शल्यचिकित्सकाकडे किंवा अशा परिस्थितीतील प्रेतांची तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या इतर कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाठवील आणि असा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकारी मृत्यूची कारणे निश्चित माहीतं करून घेण्याचा प्रयत्न करील.
असे प्रेत कुजून जाण्याचा आणि त्याची तपासणी निरुपयोगी किंवा अपायकारक होण्याचा धोका टाळून प्रेत पाठविणे पोलीस पाटलास अशक्य असले तरीही तो, ठाणे अधिकारी किंवा दंडाधिकारी त्या प्रेताचे दहन किंवा दफन करण्यास परवानगी देईपर्यंत, त्या प्रेताचे दहन किंवा दफन करण्यास प्रतिबंध करील.
ज्या व्यक्तीने गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे असे पोलीस पाटलास वाटत असेल त्या व्यक्तीस पोलीस पाटलाने पकडणे.
(१) ज्या व्यक्तीने कोणताही गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे असे पोलीस पाटलास सकारण वाटत असेल अशा कोणत्याही व्यक्तीस पोलीस पाटील आपल्या गावाच्या हद्दीत पकडील व पुरावा म्हणून उपयोगी पडण्याचा संभव असलेल्या सर्व वस्तूंसमवेत, अशा व्यक्तीस ठाणे अधिकान्याकडे पाठवील.
(२) अशा रीतीने पकडलेल्या प्रत्येक व्यक्तीस, तिला ज्या ठिकाणी पकडण्यात आले असेल त्या ठिकाणापासून दंडाधिकान्याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासाकरिता आवश्यक असेल इतका वेळ वगळून,.. २४ तासांच्या आत नजिकच्या दंडाधिकान्यासमोर उभे करण्यात येईल.
साक्षीदारांना बोलावून त्यांची तपासणी करण्याचा, साक्षी पुरावा नोंदण्याचा व लपविलेल्या वस्तूंसाठी झडती घेण्याचा अधिकार.
(१) पोलीस पाटलास, आपल्या कर्तव्याच्या कक्षेत येत असेल असा तपास करताना, साक्षीदारांना बोलावून त्यांची तपासणी करण्याचा आणि त्यांची जबानी नोंदवण्याचा आणि लपविण्यात आलेल्या वस्तूंचा शोध करण्याचा प्राधिकार असेल; मात्र निकडीच्या प्रसंगाखेरीज इतर प्रसंगी – सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या अवधीत कोणत्याही राहत्या घराची झडती घेण्यात येणार नाही याविषयी ■ पोलीस पाटील काळजी घेईल.
(२) तसेच, पोलीस पाटलास, संशयित गुन्हेगार व्यक्तींची कोणत्याही प्रकारे झडती घेण्यासाठी ■ किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या गावाच्या हद्दीत प्रवेश करण्याचा व त्या ठिकाणी काम करण्याचा प्राधिकार असेल तथापि, त्याने अशा दुसऱ्या गावाच्या पोलीस पाटलास ताबडतोब कळविणे, त्यास बंधनकारक असेल आणि अशा दुसऱ्या गावाचा पाटील त्याच्या अधिकारात असेल असे सर्व सहाय्य उक्त पोलीस पाटलास करील आणि असा पाटील झडतीचे किंवा पाठलाग करण्याचे काम चालू ठेवण्यासाठी प्रत्यक्ष जबाबदार राहील.
बेवारशी मालमत्ता.
पोलीस पाटील आपल्या गावातील सर्व बेवारशी मालमत्ता किंवा मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ याच्या तरतुदीअन्वये त्याच्या स्वाधीन करण्यात आली असेल अशी सर्व मालमत्ता आपल्या ताब्यात घेईल, आणि त्याचे गाव पोलीस आयुक्ताच्या अधिकारितेत येत असेल तर, अशा आयुक्ताकडे व इतर कोणत्याही बाबतीत, जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे, तो, ताबडतोब त्याबद्दल अहवाल पाठवील आणि त्यानंतर, तो, उक्त आयुक्त किंवा दंडाधिकारी निदेश देईल त्याप्रमाणे काम करील; मात्र, अशी १८७१ मालमत्ता गुरे अतिक्रमण अधिनियम, १८७१ याच्या किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या तत्सम कोणत्याही. कायद्याच्या तरतुदीत वर्णन केलेल्या प्रकारची असेल तर पोलीस पाटील त्या अधिनियमाच्या किंवा कायद्याच्या तरतुदीनुसार वागेल.
पोलीस पाटलाने दिलेल्या अशा प्रत्येक अहवालाची एक प्रत ठाणे अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येईल.
……..१९५१ चा मुंबई २२. चा १.
या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या गुन्ह्याबद्दल इतर कायद्यान्वये खटला भरणे.
या अधिनियमान्वये जो कोणताही गुन्हा शिक्षापात्र ठरविण्यात आला असेल त्या कोणत्याही गुन्ह्याबद्दल इतर कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही व्यक्तीवर खटला भरण्यास या अधिनियमातील कोणत्याही तरतुदींमुळे प्रतिबंध होतो असा किंवा अशा गुन्ह्याबद्दल या अधिनियमाद्वारे ज्या शास्तीची किंवा शिक्षेची तरतूद करण्यात आली असेल त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही शास्ती किंवा शिक्षा किंवा त्याहून अधिक शास्ती किंवा शिक्षा अशा इतर कोणत्याही कायद्यान्वये अशा व्यक्तीस दिली जाण्यास ती – या अधिनियमातील कोणत्याही मजकुरामुळे पात्र ठरत नाही, असा त्या तरतुदींचा अर्थ लावण्यात येणार नाही.
निरसन व व्यावृत्ती.
मुंबई ग्राम पोलीस अधिनियम, १८६७ हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे : परंतु, अधिनियम अशा रीतीने निरसित करण्यात आल्यामुळे –
(क) अशा रीतीने निरसन करण्यात आलेल्या अधिनियमाच्या पूर्वीचा अंमल किंवा त्याखाली यथोचितरीत्या केलेली किंवा करून दिलेली कोणतीही गोष्ट;
(ख) अशा रीतीने निरसन करण्यात आलेल्या अधिनियमान्वये संपादन केलेले किंवा मिळालेले कोणतेही हक्क, विशेषाधिकार किंवा पत्करलेला कोणताही भार किंवा दायित्व; (ग) अशा रीतीने निरसन करण्यात आलेल्या अधिनियमाविरुद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल लादण्यात आलेली कोणतीही शास्ती किंवा शिक्षा किंवा
(घ) वर निर्दिष्ट केल्याप्रमाणेचा कोणताही हक्क, विशेषाधिकार, भार, दायित्व, शास्ती किंवा शिक्षा यासंबंधातील कोणतेही अन्वेषण, कायदेशीर कार्यवाही किंवा उपाययोजना :
यांवर परिणाम होणार नाही आणि जणू हा अधिनियम संमत झाला नाही असे समजून, अशी कोणतीही चौकशी, कायदेशीर कारवाई किंवा उपाययोजना करता येईल, चालू ठेवता येईल किंवा अंमलात आणता येईल आणि अशी शास्ती किंवा शिक्षा लादता येईल. परंतु, आणखी असे की, पूर्ववर्ती परंतुकास अधीन राहून, अशा रीतीने, निरसित करण्यात आलेल्या अधिनियमान्वये करण्यात आलेली कोणतीही गोष्ट किंवा कारवाई ही (करण्यात आलेली कोणतीही नेमणूक किंवा प्रत्यायोजन व काढलेली अधिसूचना, आदेश किंवा नियम धरून), या अधिनियमाच्या तरतुदींशी जेथवर विसंगत नसेल तेथवर, या अधिनियमाच्या तत्सम तरतुदीअन्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कारवाई आहे, असे समजण्यात येईल, आणि या अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही गोष्टीद्वारे तिचे अधिक्रमण करण्यात आल्याशिवाय व अधिक्रमण करण्यात येईतोपर्यंत, त्याप्रमाणे अंमलात असण्याचे चालू राहील.
१८६७ चा मुंबई ८.
हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here