PM KISAN योजनेचे हप्ते आता शेतकऱ्यांचे या बँकेत जमा

PM KISAN योजना या योजनेतून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये अनुदान मिळते. PM KISAN योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या नेमक्या कोणत्या बँक खात्यात जमा होतात हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

प्रधानमंत्री शेतकरी योजनेतून आपल्याला आतापर्यंत २६ हजार इतके अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. म्हणजेच १३ हप्ते हे शेतकऱ्यांना भेटलेले आहेत. यापैकी सर्वच हप्ते सर्व शेतकऱ्यांना भेटलेले नाहीत. पण ज्या शेतकऱ्यांना १३ वा हप्ता जमा झालेला आहे त्यांना १४ हप्ता मिळणार व ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बरॊबर आहे त्यांना त्यांचे पुढील हप्ते मिळणार आहेत.

शेतकरी हे मोदींचे पैसे, मोदींचा हप्ता आला असा या योजनेचा उल्लेख करतात. हप्ता जमा झाले का नाही पाहण्यासाठी आपली ज्या-ज्या बँकेत खाती आहेत त्या बँकेत जातात. त्या बँकेत गेल्यानंतर त्यांना माहिती नसते कि या बँक खात्यात आपले पैसे जमा झालेले नाहीत. नेमके कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होतात हे त्यांना माहित नसल्याने ते प्रत्येक बँक मध्ये जात असतात.

आपल्याला बँकेत न जाता आपल्या कोणत्या बँकमध्ये आपले PM KISAN चे पैसे मिळणार आहेत हे आपल्याला घरबसल्या ऑनलाईन मिळवता येते का ? तर हो आपण घरबसल्या PM KISAN चे हप्ते कोणत्या बँकेत जमा झालेले आहे हे पाहू शकतो ते खालीलप्रमाणे.

कोणत्या बँकेत मोदीचे हप्ते जमा ते पहा.

१) आपल्याला आधारच्या वेबसाईट वर जावे लागेल.

२) आपली बँक कोणती आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

३) वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला पहिला १२ अंकी आधार नंबर टाकावा लागेल.

४) त्यानंतर फोटो मध्ये दिलेला Security Code टाका .

५) सेंड otp वर क्लिक करा.तुमच्या आधार रजिस्टर मोबाईलवर otp जाईल

६) OTP बॉक्स मध्ये लिहून सबमिट करा.

७) यानंतर आपल्याला खालील फोटो सारखी माहिती दिसेल.

८) आपल्याला आता आपले आधारशी कोणती बँक लिंक आहे ते तुम्हाला दिसून येईल.

अश्याप्रकारे आपल्याला PM KISAN चे हप्ते कोणत्या बँकेत जमा होणार आहेत हे पाहता येणार आहे.

आजच्या लेखात आपल्याला प्रधानमंत्री शेतकरी योजनेचे हप्ते कोणत्या बँकेत जमा होणार आहे हे कसे पाहायचे हे आपण पाहिले आहे. खालील प्रमाणे १४ वा हप्त्याची यादी कशी पाहायची याची माहिती दिलेली आहे त्यावर क्लिक करून माहिती मिळवू शकता.

१४ व्या हप्त्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा

shivsurya: