आपली १८ वर्ष पूर्ण झाली असेल तर आपल्याला मतदान करण्याचा अधिकार असतो, पण आपले नाव मतदान यादीमध्ये असणे गरजेचे असते. आपले नाव मतदान यादीमध्ये येण्यासाठी आपल्याकडे मतदान कार्ड असणे गरजेचे असते. मतदान कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला अनेक कागदपत्रांची आवशक्यता असते. तर आपण मतदान कार्ड नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे पाहणार आहोत.
नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा येथे क्लिक करा
३)आधार कार्ड झेरॉक्स
४) २ पासपोर्ट साईज फोटो
५)घरातील नात्यातील(आई, वडील, भाऊ, बहीण)यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स
घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे
१)जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२)रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा येथे क्लिक करा
३)२ पासपोर्ट साईज फोटो
४)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६)पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७)लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला येथे क्लिक करा
नाव समाविष्ट कसे कराल.
आपल्याला मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना न ६ चा फॉर्म भरून वरील कागदपत्र जोडून आपल्या गावच्या बी.एल.ओ. ऑफिसर कडे द्यावा किंवा आपण ऑनलाईन सुद्धा मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करू शकता त्यासाठी आपल्याला खालील व्हिडिओ पाहावा लागेल.