Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana New Document

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही १५ जुलै ऐवजी ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. Ladki Bahin Yojana या योजनेमध्ये कागद्पत्रामध्ये बदल करण्यात आलेली आहेत.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करु इच्छितो-
१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.


२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.


३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.


४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे.


५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.


६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.


७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना म्हणजे ?

महाराष्ट्र सरकारने “Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana” हि योजना लागू केली असून यामध्ये महिलांना १५००रुपये महिना लाभ मिळणार आहे. या योजनेतून वय वर्ष २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना वार्षिक १८ हजार मिळणार आहेत.या साठी अनेक अटी व शर्ती घातलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील मुली व महिलांना स्वावलंबी,आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच महिला व त्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य पोषण स्थितीत सुधारणा होण्यासाठी राज्य सरकारने योजना घोषित केली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 👇 👇

कागदपत्रे

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे (अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला). आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य). रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशनकार्ड.
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 👇 👇

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ऍपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.
  • पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  • ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  • वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/ आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
  • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
shivsurya: