आपल्याला आपल्या गावातील राशन कार्ड यादी त्याचबरोबर धान्य वाटप यादी मोबाईलवर कशी पाहायची हि माहिती आहे का?
आपल्याकडे रेशन कार्ड आहे का ? रेशन कार्ड असल्यास आपले नांव रेशन कार्ड मध्ये नोंद आहे का ? रेशनकार्ड चे खूप प्रकार आहेत पण आपल्याला आपल्या रेशन कार्डचा ऑनलाईन RC नंबर माहित नसेल त्याचबरोबर आपल्याला आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावातील सर्व लोकांचे RC नो तसेच कोणाला राशन किती मिळते याबद्दल माहिती आहे का.
आपल्या गावातील नागरिकांना रेशन मिळते तर कोणाकोणाला राशन मिळते हे तुम्हाला माहित नसेल तर आपण घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकता. राशन दुकानदार आपल्याला आपले राशन बरोबर देतो का हे पाहता येणार आहे.
गावातील एकूण किती नागरिकांना मोफत राशन ( प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ) यामधून मिळते. त्याचबरोबर रेगुलर म्हणजे पैसे देऊन किती किलो राशन मिळते हे आपण मोबाईलवर पाहू शकतो.
कसे चेक करावे ?
- आपल्या गावातील नागरिकांना किती राशन दिले जाते त्याचबरोबर राशन धान्य वाटप यादी पाहण्यासाठी आपल्याला प्रथम खालील वेबसाईट वर जावे लागेल.
- त्यानंतर आपल्याला कॅप्चा भरावा लागेल आणि सबमिट.
- Know your Ration Entitlement असे पेज ओपन होईल.
- सर्वात प्रथम Allocation Type मधून रेगुलर आणि PMGKY या ऑपशन पैकी आपल्याला एकाला क्लीक करा.
- त्यानंतर महिना निवडा व वर्ष निवडा
- त्यानंतर आपला जिल्हा, तालुका निवडा
- सर्वात शेवटी आपण आपल्या गावचे नाव सिलेक्ट करा . गाव जर दिसत नसेल तर आपल्या गावातील ज्यांना धान्य वाटप दिले आहे त्या संस्था,बचत गटाचे नावावर क्लिक करा
आपल्याला आता आपल्या गावची राशन वाटप यादी ओपन झालेली दिसेल. त्याचबरोबर आपल्याला गावाला किती राशन मिळालेले आहे. आणि प्रत्येक नागरिकाचे नाव ओपन झालेले दिलेलं त्यापैकी त्यांना राशन किती केलो दिलेले आहे हे समजून येईल .
अशा प्रकारे आपण आपल्या गावातील धान्य वाटप यादी आपल्या मोबाईल वर पाहू शकता.