घरबसल्या मिळवा ऑनलाईन सिटी सर्वे उतारा मोफत । आपल्या घरचा मालमत्ता पत्रक मिळवा २ मिनिटात

मित्रहो आपण आपल्या घरचा सिटी सर्वे उतारा काढण्यासाठी तालुका ठिकाणी भूमिअभिलेख कार्यालयात चकरा मारत असता. त्याठिकाणी जाऊन आपण अर्ज करतो त्यानंतर आपल्याला बऱ्याच दिवसांनी आपल्या मालमत्तेचा सिटी सर्वे उतारा मिळतो. पण आता तुम्हाला कोठेही धावपळ करायची गरज नाही तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन सिटी सर्वे उतारा ( मालमत्ता उतारा ) काढता येणार.

सिटी सर्वे उतारा कसा काढावा ?

१) सिटी सर्वे उतारा काढण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम शासनाच्या भूमिअभिलेख यांच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

त्यासाठी तुम्हाला खालील लिंक ला क्लीक करा .

https://bhulekh.mahabhumi.gov.in/

आता तुम्हाला तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल. ही महाराष्ट्र शासनाची अधिकुत वेबसाईट आहे.

२)यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल किंवा तुमच्या समोरील नकाशावरील तुमचा जिल्हयावर क्लिक करा.

३) यानंतर तुम्ही ७/१२,८अ आणि मालमत्ता पत्रक या पर्यायापैकी मालमत्ता पत्रक हे बटन निवडा

  • त्यानंतर तुम्ही प्रथम तुमचा जिल्हा निवडा
  • त्यानंतर तालुका भूमिअभिलेख सिलेक्ट करा
  • आता तुमचे गाव सिलेक्ट करा.
  • त्यानंतर आपला सिटी सर्वे ( CTS NO ) टाका

आणि त्यानंतर सर्च करा किंवा आपल्याला सिटी सर्वे नंबर माहिती नसेल तर तुम्ही तुमचे पहिले नाव, मधील नाव किंवा आडनाव टाकून नावानुसार शोधू शकता.

शेवटी पुढे याबटन वर क्लिक करा.

आता तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि कॅप्चा भरा त्यानंतर मालमत्ता पत्रक पहा यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर मालमत्तापत्रक म्हणजे सिटी सर्वे उतारा ओपन होईल तो डाउनलोड करा.

अश्याप्रकारे आपण आपला सिटी सर्वे उतारा ( मालमत्ता पत्रक ) घरबसल्या डाउनलोड करू शकता.

मोफत ७/१२ असा मिळवा :-

shivsurya:
Related Post