ग्रामपंचायत माहिती । ग्रामपंचायत दप्तर माहिती । ग्रामपंचायत दप्तर १ ते ३३ नुमने । grampanchayat information | grampanchayt dapttar 1 to 33 pdf | all information of village grampanchayat | ग्रामपंचायत दाखले । ग्रामपंचायत योजना ।
आपण गावात राहत असतो तर आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायत मध्ये आपल्याला सर्व प्रकारची आपली माहिती मिळत असे. आपल्याला कोणत्याही प्रकारचे दाखले प्रमाणपत्र तसेच आपल्या गावची ग्रामपंचायत कोठे कोठे विकास काम करत असते याची सर्व माहिती आपल्याला ग्रामपंचायत मध्ये मिळून जाते. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या गावची लोकसंख्या, आपली ग्रामपंचायत कोणकोणती कामे करते, कोण कोणते दाखले पुरवते, आपल्या गावचा सरपंच, उपसरपंच सदस्य पदाधीकारी तक्ता त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी हि माहिती आता आपल्याला शासनाच्या वेबसाईट वर एका क्लिक वर मिळणार आहे.
आपल्याला या शासनाच्या वेबसाईट वर खालीलप्रमाणे माहित मिळणार आहे.
पधादिकारी माहिती
१) ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांची माहिती मोबाईल क्रमांक व फोटो
२) ग्रामपंचायत पदाधिकारी तक्ता त्यांचे मोबईल क्रमांक व फोटो
३) ग्रामपंचायत कर्मचारी माहिती व फोटो
ग्रामपंचायत माहिती
- ग्रामपंचायत क्षेत्रफळ माहिती
- वार्ड संख्या
- कुटूंब संख्या
- एकूण कुटूंब संख्या
- एकूण स्त्री पुरुष संख्या
ग्रामपंचायत वार्षिक उत्त्पनाची स्थिती
- १५ वा वित्त आयोग निधी
- १४ वा वित्त आयोग निधी
- स्वनिधी
- इतर निधी
ग्रामपंचायतीमधील सर्वसाधारण सुविधा
- पाणीपुरवठा, विद्युत, वैद्यकीय सुविधा व इतर
- शाळा, पोस्ट ऑफिस, बँक सुविधा व इतर
- वाचनालये, पेट्रोल पंप, दूध संकलन केंद्र व इतर
- माहिती संगणकीकरण व सेवा वितरण
- राबविण्यात आलेल्या योजना
वरीलप्रमाणे आपल्याला आपल्या गावची माहिती एका क्लिक वर मिळून जाते.