आपल्याला माहीतच आहे गावोगावी कॅम्प लावून bandhkam kamgar नोंदणी केली जाते. आणि त्यांना सेफ्टी किट वाटप सुद्धा केलेले आहे. त्या किट मध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप केलेला आहे.
त्याचप्रमाणे आपण जर बांधकाम कामगार असाल.bandhkam kamgar नोंदणी असेल तर तुम्हाला गृहउपयोगी वस्तू तुमच्या घरात उपयोगास येणाऱ्या दिल्या जातात.
बांधकाम कामगारांना कोणकोणत्या गृहउपयोगी वस्तू दिल्या जातात त्याचबरोबर आपल्याला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अटी शर्ती काय आहेत याबद्दल आपण माहिती घेऊयात.
योजनेच्या अटी व शर्ती :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) या योजनेचा लाभार्थी राहील.
नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांनी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकम)/ सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइवाकमं) यांचेकडे भरून दिल्यानंतर वस्तू संच पुरविण्यात येतील.
गृहपयोगी वस्तू संच
गृहपयोगी संचातील वस्तू नग | नग |
ताट | ४ |
वाट्या | ८ |
पाण्याचे ग्लास | ४ |
पातेले झाकणासह | १ |
पातेले झाकणासह | १ |
पातेले झाकणासह | १ |
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) | १ |
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) | १ |
पाण्याचा जग (२ लीटर) | १ |
मसाला डब्बा (०७ भाग) | १ |
डब्बा झाकणासह (१४ इंच) | १ |
डब्बा झाकणासह (१६ इंच) | १ |
डब्बा झाकणासह (१८ इंच) | १ |
परात | १ |
प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील) | १ |
कढई (स्टील) | १ |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | ३० |
एकूण |
घरातील वापरातील वस्तू संच वितरीत करताना नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे)
त्यांचे छायाचित्र काढणे व बायोमॅट्रीक पध्दतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य राहील.
गृहपयोगी वस्तू संच वितरण्णाकरीता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरणाचे शिबीर (Camp) आयोजित करण्यात येतील.
आवश्यक पात्रता
- अर्जदार कामगाराचे वय हे १८ ते ६० वर्षे दरम्यान असणे गरजेचे.
- कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी १५ वर्ष असावा.
- अर्जदार हा मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा बांधकाम कामगार म्हणून काम म्हणून काम करणे आवश्यक
- कामगार नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा